कार चोरणा-या टोळीच्या मुसक्या आवळल्या!

By Admin | Published: March 5, 2016 02:33 AM2016-03-05T02:33:15+5:302016-03-05T02:33:15+5:30

औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकास यश; चिखली पोलिसांनी महत्त्वाची भूमिका.

The thieves of the car Chorana! | कार चोरणा-या टोळीच्या मुसक्या आवळल्या!

कार चोरणा-या टोळीच्या मुसक्या आवळल्या!

googlenewsNext

चिखली (जि. बुलडाणा) : मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात सुमारे ४00 कार चोरणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकास यश आले असून, मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात चिखली पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. औरंगाबाद विभागासह मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात कार चोरीचा धडाका राबविणार्‍या कुख्यात चोरट्यांचा छडा लावण्यासाठी औरंगाबाद गुन्हे शखेतील पीएआय पी.डी. भारती यांचे तपास पथक २ मार्च रोजी चिखली पोलीस स्टेशनला आले. त्यावरून ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ अजय शेगोकार व पोकाँ विजय सोनोने यांनी कार चोरणार्‍या आरोपींच्या कॉल डिटेल्सवरून आरोपी शेख अदील शेख इकबाल वय २५ वष्रे रा.अंगुरचा मळा चिखली यास रात्री साडेआठच्या सुमारास अटक केली. दरम्यान, अटकेतील आरोपी शे.अदील शे.इकबाल याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून या टोळीचा म्होरक्या तथा मुख्य आरोपी स.शकील स.युसूफ वय २५ वष्रे रा.जवाहर नगर, बुलडाणा व इतर दोन आरोपींसह औरगांबाद येथून एक चारचाकी वाहन चोरून ते वाहन एजंटमार्फत विकून आलेल्या पैशांची आपसात विभागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी शे.अदील शे.इकबाल याला ताब्यात घेतल्यानंतर औरंगाबाद स्थागुशाचे पीएसआय भारती यांनी दिलेल्या माहितीवरून या टोळीचा म्होरक्या स. शकील स.युसूफ हा स्थानिक मेहकर फाटा येथे असल्याची माहिती मिळाली असता, ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शेगोकार यांनी त्याचा शोध घेतला; मात्र तोपर्यंंंत या आरोपीने लोणारला पलायन केल्याचे समजल्याने त्या माहितीवरून पीएसआय भारती यांच्या पथकाने लोणार एएसआय सुनील काकड व शेख अख्तर यांच्या मदतीने या टोळीचा मुख्य सूत्रधार आरोपी स.शकील यास लोणार येथून ताब्यात घेतले आहे. मूळचा बुलडाणा येथील स.शकील या चोरट्याने आपल्या विविध साथीदारांसह आजपर्यंंंत सुमारे ४00 कारची चोरी करून धुमाकूळ घातला होता.

Web Title: The thieves of the car Chorana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.