जिल्ह्यात चोरांचा धुडगूस !

By Admin | Published: March 5, 2017 12:17 AM2017-03-05T00:17:07+5:302017-03-05T00:20:02+5:30

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री चोरांनी अक्षरश: धुडगूस घातला.

Thieves in the district! | जिल्ह्यात चोरांचा धुडगूस !

जिल्ह्यात चोरांचा धुडगूस !

googlenewsNext

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री चोरांनी अक्षरश: धुडगूस घातला. गेवराई तालुक्यातील उमापूरमध्ये काळेवस्तीवर दरोडेखोरांनी दोन कुटुंबांना मारहाण करुन ऐवज पळविला. बीडमध्ये दोन दुकाने फोडली. शिवाय, एका प्राध्यापकाच्या घरातून दागिने लंपास केले. माजलगाव तालुक्यातही घरफोडी झाली. २४ तासात ५ ठिकाणी डल्ला मारून लाखोंचा ऐवज लांबवित चोरांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.
सहयोगनगरात मोबाईल शॉपीचे
शटर उचकटले
बीड शहरातील सहयोगनगर भागात शुक्रवारी रात्री चोरांनी भैय्यासाहेब विश्वनाथ मस्के यांच्या सुकीर्ती मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आतील मोबाइल व इतर साहित्य असा १ लाख ६० हजार ९८६ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनास्थळी सहायक निरीक्षक सतीश जाधव यांनी भेट दिली. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुकान फोडून ३० हजार पळविले
बीड शहरातील जालना रोडवरील महादेव सोपान मुंडे यांचे आॅटोमेबाईल्सच्या दुकानाचे शंटर वाकवून चोरांनी शुक्रवारी रोख ३० हजार पळविले. याप्रकरणी मुंडे यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली. तपास सहायक फौजदार एस. एस. शिंंदे करत आहेत.
मनुरवाडीत घरफोडी
माजलगाव तालुक्यातील मनूरवाडी येथे शिवाजी गोवर्धन गायकवाड या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा तोडून चोरांनी दागिने, साड्या, किरणा व इतर साहित्य असा ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास पोहेकॉ पी. के. खोडवे करत आहेत. चोरांनी शेजाऱ्यांच्या घराच्या कड्या बाहेरुन लावून गायकवाड यांच्या घरात हात साफ केला. या घटनेमुळे मनूरवाडी येथे खळबळ उडाली आहे. गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी शनिवारी केली.
अडीच लाखांचे दागिने लंपास
बीड शहरातील राधाकृष्ण मंदिराजवळील सारडा रेसिडन्सी येथे राहणारे प्रा. अरविंद कारभारी आघाव यांचे घर चोरांनी शुक्रवारी दुपारी फोडले. आघाव हे महाविद्यालयात गेले होते, तर कुटुंब बाहेर होते. बंद दरवाजाचा कडीकोंयडा उचकटून चोरांनी आत प्रवेश केला. कपाटातील अडीच लाख रूपयांचे दागिने घेऊन चोर पसार झाले. सारडा रेसीडन्सी सारख्या गजबलेल्या भागामध्ये चोरांनी दिवसा घरफोडी केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी प्रा. आघाव यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thieves in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.