गंगापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:50 AM2017-10-29T00:50:37+5:302017-10-29T00:50:59+5:30

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या

Thieves in Gangapur | गंगापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

गंगापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या, तर शनिवारी (दि.२८) भरदिवसा बसस्थानकात महिलेचे गंठन लांबविल्याची घटना घडली. चोरट्यांनी एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरात एकापाठोपाठ एक चो-यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी गंगापूर पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. पोलीस शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात अशस्वी ठरल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल रोष व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे महिनाभरात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत १५ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांतील आरोपींचा अद्यापही थांगपत्ता नाही. आता शनिवारी पुन्हा चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. दरम्यान, शनिवारी चोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषणची दोन पथके गंगापूरमध्ये दाखल झाली होती.
पहिल्या घटनेत शनिवारी पहाटे ४ वाजेदरम्यान गंगापूर शहरातील जयसिंगनगरमध्ये मंगलबाई विलास निरफळ आपल्या कुटुंबातील सदस्यांसह झोपले असताना अज्ञात तीन जणांनी तोंडाला रुमाल बांधून घरात प्रवेश केला व निरफळ यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून घरात जे काही असेल ते तात्काळ काढून देण्याची मागणी केली. यानंतर चोरट्यांनी घरातील ५८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
दुस-या घटनेत वैैजापूर मार्गावरील रमेश तापडिया यांचे हार्डवेअर असलेल्या दुकानाच्या बेसमेंटसमोर त्यांनी ९० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली होती. पहाटे ४ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी लॉक तोडून तापडिया यांची दुचाकी लंपास केली. सदर आरोपींनी वैजापूरच्या दिशेने पलायन केल्याचे सीसीटीव्हीत दिसले. मात्र, आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांची ओळख पडली नाही.
तिसºया घटनेत जयसिंगनगरमधील पप्पू राजपूत यांच्या घरासमोरील ७५ हजार रुपये किमतीची स्पोर्टस् बाईक चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने लंपास केली. एकाच रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी केलेल्या चो-यांची शहरात वार्ता पसरताच नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल रोष व्यक्त करून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. दरम्यान या तिन्ही घटनांची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली.

Web Title: Thieves in Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.