दागिने नाही तर घरफोडीकरून चोरट्यांनी किराणा सामान पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:14 PM2020-04-02T12:14:56+5:302020-04-02T12:15:37+5:30
लॉकडाऊनमुळे अंनेकांना हाताला काम नाही
वेरूळ : वेरूळ येथे बुधवारी रात्री चोरट्यांनी कसाबखेडा रोडवरील एक घरफोडले. यात घरातील रोख रक्कम दहा हजार रुपये व किराणा सामान लंपास केले आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली,त्यातूनच चोरट्यांनी केवळ किचनमध्येच डल्ला मारला असल्याची चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वेरूळ येथील कसाबखेडा रोडवर बाबासाहेब कचरू मिसाळ यांचे घर आहे. मध्यरात्री त्यांच्या किचन रूमच्या घरात अद्यात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम दहा हजार रूपये व किराणा सामान लंपास केले. सकाळी उठल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी याबाबतची माहिती खुलताबाद पोलीसांना दिली.
पोहेकॉ वाल्मीक कांबळे , हनुमंत सातपुते यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. सध्या कोरेनामुळे सर्वत्र शुकशुकाट असल्याने अनेकजनाच्या हाताला काम धंदा नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळेच चोरट्यांनी किराणा सामानाची चोरी केली असल्याची चर्चा नागरिकांत आहे. खुलताबाद पोलीसांनी अद्यात चोरट्याविरूध्द गुन्हा खुलताबाद पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे हे करीत आहे.