तडेगाववाडी शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 12:33 AM2017-05-30T00:33:48+5:302017-05-30T00:36:01+5:30
भोकरदन : तालुक्यातील तडेगाववाडी शिवारातील शेतवस्तीवर चोरट्यानी धुमाकूळ घालत दोन घरांमधील तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील तडेगाववाडी शिवारातील शेतवस्तीवर चोरट्यानी धुमाकूळ घालत दोन घरांमधील तीन लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
सूत्रांनी सांगितले, की त्र्यंबक फुलस्ािंंग बम्हणावत व सिताराम महासिंंग घुंसिंगे (रा. तडेगाववाडी) हे गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतवस्तीवर राहतात. घरात उकाडा जाणवत असल्यामुळे त्र्यंबक ब्रम्हणावत कुटुंबीयांसोबत बाहेरच झोपले होते. ही संधी साधून
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील दोन लोखंडी पेट्या शेजारच्या ऊसाच्या शेतात नेऊन त्यातील सोन्याची एकदाणी, तीन सोनपोत, अंगठी, रोख चार हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सीताराम घुसिंगे यांच्या घराकडे वळविला. कुलूप तोडून घरात ठेवलेले रोख पन्नास हजार व घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास केली. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे बम्हणावत व घुसिंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.