तिसºया दिवशीही सचखंड रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:12 AM2017-08-28T00:12:41+5:302017-08-28T00:12:41+5:30
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या अनुयायामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे सलग तिसºया दिवशीही म्हणजे सोमवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड-श्रीगंगानगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पंजाबला जाणारे प्रवासी नांदेडात अडकून पडले असून रेल्वे प्रशासनालाही मोठा फटका बसला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या अनुयायामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे सलग तिसºया दिवशीही म्हणजे सोमवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड-श्रीगंगानगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पंजाबला जाणारे प्रवासी नांदेडात अडकून पडले असून रेल्वे प्रशासनालाही मोठा फटका बसला आहे़
डेरा सच्चा सौदाचे बाबा राम-रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारपासून पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांच्या समर्थकांकडून जाळपोळ आणि हिंसाचार केला जात आहे़ त्यामुळे पंजाब, चंदीगड आणि हरियाणातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ उत्तर भारतातून नांदेडकडे येणाºया बहुतांश गाड्या विलंबाने धावत आहेत़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द केली होती़
रविवारीही या मार्गावरील प्रवासी नांदेडातच अडकून पडले होते़ त्यात २८ आॅगस्ट रोजीही नांदेड- अमृतसर आणि श्रीगंगानगर या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़
पंजाब येथून नांदेडातील सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात, परंतु गेल्या तीन दिवसांपासून नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे पंजाबला जाणारे भाविक नांदेडातच अडकून पडले आहेत़ सोमवारीही ही गाडी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून त्याचा रेल्वेलाही मोठा फटका बसला आहे़ रेल्वे प्रवाशांना होणाºया त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनानेही दिलगिरी व्यक्त केली आहे़