सौताडा यात्रेवर दुष्काळाचे सावटश्रावणातील तिसऱ्या
By Admin | Published: August 11, 2014 12:10 AM2014-08-11T00:10:12+5:302014-08-11T00:18:16+5:30
पाटोदा : सौताडा येथे पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़
पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते़ यावेळी मानाच्या घोड्याची मिरवणूक काढली जाते़ यावर्षी मात्र पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रपातही थांबला असून यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़
बीड आणि नगरच्या सीमेवर पाटोदा तालुक्यातील शेवटचे गाव सौताडा आहे़ येथे ५०० फूट खोलीची दरी असून हा निसर्गरम्य परिसर आहे़ प्रभु रामचंद्र वनवासात असताना त्यांचे वास्तव्य होते, अशी अख्यायिका आहे़ तसेच विचारणा नदीचा उगमही या भागात आहे़ ऐतिहासिक महत्व असलेल्या सौताडा येथे तिसऱ्या सोमवारी रामेश्वराची यात्रा भरते़ यात्रेनिमित्त मानाच्या शामकर्ण या घोड्याची मिरवणूक काढली जाते़
यावर्षी मात्र पाऊस नसल्याने या यात्रेवर दुष्काळाचे सावट आहे़ येथील धबधबा अद्यापही वाहत नसल्याने येथील वातावरण शांतच आहे़ येथे यात्रेनिमित्त धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होतात़ येथे यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात़
यावर्षी धबधबा वाहत नसल्याने पर्यटकांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले़ येथे सोमवारी पूजा, अभिषेक व महाआरती होणार असल्याचे रामभाऊ सानप गुरुजी यांनी सांगितले़ दरम्यान येथील रामकुंडातही पुरेसे पाणी नसल्याने याचा परिणाम परिसरातील हिरवाईवर झाल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर)
दर्शनासाठी लागते भाविकांची रीघ