पतीचा खून करणाºया तिसºया पत्नीला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:53 PM2018-02-14T23:53:56+5:302018-02-14T23:54:00+5:30
दोन एकर शेती स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी मध्यरात्री लोखंडी गजाने मारहाण करून पतीचा खून करून विजेच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाल्याचे भासवणाºया मयताच्या तिसºया पत्नीला सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (दि.१४ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दोन एकर शेती स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी मध्यरात्री लोखंडी गजाने मारहाण करून पतीचा खून करून विजेच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाल्याचे भासवणाºया मयताच्या तिसºया पत्नीला सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (दि.१४ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात मृत रामदास साळूबा लोखंडे (४८), रा. साखरवेल, ता. कन्नड यांची पहिली पत्नी लक्ष्मीबाई रामदास लोखंडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, रामदास हे तिसरी पत्नी संगीताबाई (४०) हिच्यासोबत राहत होते. पतीच्या नावावर असलेली दोन एकर वडिलोपार्जित शेती स्वत:च्या नावावर करून द्यावी, असा तगादा संगीताबाई रामदासच्या मागे लावत होती. त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यातूनच २१ आॅगस्ट २०१२ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने रामदास यांच्या डोक्यावर, तसेच हात-पाय, ओठ, डोळे, पाठ आदी अनेक ठिकाणी लोखंडी गजाने मारहाण करून त्यांचा खून केला.
रामदासला विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खांडेकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणी वेळी, सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. रामदास यांना मारहाणीमध्ये झालेल्या जखमा या विजेच्या धक्क्याने होऊ शकत नाहीत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी संगीताबाईला भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. या प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुरावा, तसेच मृताच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची झालेली इजा व त्यामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील रक्तस्रावातून रामदास यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल, या बाबींची न्यायालयाने दखल घेऊन वरीलप्रमाणे निकाल दिला.