तेरा लाखांची धाडसी चोरी

By Admin | Published: June 18, 2014 01:09 AM2014-06-18T01:09:27+5:302014-06-18T01:26:04+5:30

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून

Thirteen million brave theft | तेरा लाखांची धाडसी चोरी

तेरा लाखांची धाडसी चोरी

googlenewsNext

सोनपेठ: येथील बुरांडेनगरातील डॉ. मधुकरराव बुरांडे यांच्या घरी १७ जून रोजी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व घरातील खोल्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून ३५ तोळे सोने व रोख ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज पळविला.
डॉ. बुरांडे यांच्या घरी यापूर्वी एकवेळ दरोडा व दागिण्यांची चोरी असे दोन वेळा चोरीचे प्रकार घडले होते. या झालेल्या चोरीपैकी एकाही चोरीचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले नाही. मात्र १७ जूनच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी १३ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
डॉ. बुरांडे यांचे चिरंजीव जगदीश बुरांडे हे १७ जूनच्या पहाटे २ वाजता उठून त्यांनी घरात फेरी मारली. पाणी पिऊन ते नेहमीच्या खोलीत झोपण्याऐवजी दुसऱ्या खोलीत झोपले. चोरट्यांनी घराच्या पश्चिमेकडील चॅनलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला. नेहमीच्या झोपण्याच्या खोलीत असलेले कपाट फोडून चोरट्यांनी त्यातील दागिणे चोरली. खोलीतील सामान दागिणे शोधताना अस्तव्यस्थ टाकून दिली. तसेच स्वंयपाकघराला लागून असलेल्या देवघरात ठेवलेले दागिणेही चोरट्यांनी पळवून नेले. घरातील आणखी दोन खोल्यात कपडे अस्ताव्यस्थ टाकून दिले. डॉ. बुरांडे झोपलेल्या खोलीतही चोरट्यांनी ऐवजाची शोधाशोध केली. परंतु, त्यांना काही हाती लागले नाही. जदगीश बुरांडे यांनी सोनपेठ पोलिसात फिर्याद देऊन त्यात ३५ तोळे सोने किंमत ९ लाख रुपये व रोख ४ लाख रुपये पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी श्वानपथक मागविले. परंतु, चोरट्यांचा मागमूस लागला नाही. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. बऱ्याच दिवसांनी चोरट्यांनी मोठी चोरी करुन पोलिसांना आव्हान उभे केले आहे. (वार्ताहर)
कर्मचाऱ्यांना सवलत
परभणी: २० जून रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. ही निवडणूक शुक्रवारी आल्यामुळे कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी असणार नाही. ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांच्यासाठी चार तासाची सवलत दिली जाणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी सोयीच्या वेळेत मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सिंह यांनी केले आहे.
यापूर्वीही झाली होती चोरी
सोनपेठ येथील डॉ.बुरांडे यांच्या घरी यापूर्वीही चोरीचे प्रकार घडले आहेत. या परिसरात नेहमीच चोरीचे प्रकार घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरी झाल्यानंतर श्वानपथकास पाचारण करण्यात आले. परंतु, त्यात यश आले नाही. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Thirteen million brave theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.