मतमोजणीमुळे आंदोलनाचे हत्यार तूर्तास म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:47 PM2019-05-21T23:47:53+5:302019-05-21T23:48:41+5:30

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी आंदोलन थांबविले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी जाहीर केली.

Thirty-five years after the counting of votes | मतमोजणीमुळे आंदोलनाचे हत्यार तूर्तास म्यान

मतमोजणीमुळे आंदोलनाचे हत्यार तूर्तास म्यान

googlenewsNext
ठळक मुद्देमहसूल कर्मचारी संघटना : गुरुवारनंतर पुन्हा सुरू करणार काम बंद आंदोलन


औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असल्यामुळे महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारी सायंकाळी आंदोलन थांबविले आहे. शुक्रवारपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याची भूमिका जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सूर्यवंशी, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी जाहीर केली.
१८ मेपासून संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र, बुधवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीच्या आणि गुरुवारी होणाºया मतमोजणीच्या अनुषंगाने संघटनांनी लोकशाहीसाठी माघार घेतली आहे. मतमोजणी प्रक्रियेनंतर पुन्हा संघटना मागण्यांवर ठाम राहणार असल्याचे गिरगे, सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून महसूल संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी अशी, कन्नडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात १५ मेला बापू रिंढे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येप्रकरणी मंडळ अधिकारी बी.एन. गवळी, उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहनचालक सुनील चिंधुटे यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविला. सदरील प्रकरणात पोलिसांना नि:पक्षपातीपणे भूमिका बजावता आला नाही. त्यामुळे तेथील पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे, तसेच महसूल कर्मचाºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. या मागणीसाठी महसूलमधील सर्व संघटनांनी १८ मेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा परिमाण दुष्काळ उपाययोजनांवर होत नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र, महसूल कामकाजावर याचा परिणाम झाला आहे.
शुक्रवारी ठरणार भूमिका
जिल्ह्यातील ८०० हून अधिक कर्मचारी कामबंद आंदोलनात आहेत. महसूल संघटनांच्या मागणीवर प्रशासनाने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. मतमोजणीची प्रक्रिया संपताच महसूल संघटना पुन्हा आंदोलन करणार आहेत. मतमोजणीत तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून कार्यरत राहणार आहेत. मतमोजणीनंतर महसूल विभागातील संघटनेच्या सर्व पदाधिकाºयांची बैठक होईल. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. शुक्रवारनंतर जिल्हापातळीवर आणि लगेचच मराठवाडा पातळीवर सर्व संघटनांकडून आंदोलन करण्याचा विचार होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Thirty-five years after the counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.