जिल्ह्यात साडेचार हजार तीव्र कुपोषित बालके

By Admin | Published: July 15, 2017 12:22 AM2017-07-15T00:22:33+5:302017-07-15T00:25:47+5:30

नांदेड: जिल्ह्यातील गरोदरमाता आणि बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे़

Thirty-four thousand acute malnourished children in the district | जिल्ह्यात साडेचार हजार तीव्र कुपोषित बालके

जिल्ह्यात साडेचार हजार तीव्र कुपोषित बालके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यातील गरोदरमाता आणि बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या साडेचार हजारांवर पोहोचली आहे़ कुपोषणाचे अधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, भंडारा, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांच्या यादीत आता नांदेडचाही समावेश होण्याची शक्यता आहे़
ग्रामीण भागात गरोदरमाता व बालकांच्या आरोग्यावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका असो किंवा तालुकास्तरावर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी़ बालकांना सदृढ करणे, त्यांना आरोग्यदायी जीवन अन् बौद्धिक क्षमता वाढविणे हा त्यामागचा उद्देश असतो़ परंतु यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्यामुळे दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे़ आजघडीला जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४ हजार ५०८ वर पोहोचली आहे़
त्यात किनवट- २८०, मुखेड-२५७, देगलूर-१०४, बिलोली-१०९, कंधार-७८५, भोकर-७६, हदगाव-२६०, नांदेड-३८५, लोहा-९०९, नायगांव-१४५, माहूर-३८०, उमरी-१४७, मुदखेड-२८०, हिमायतनगर-१४९, धर्माबाद- १८१, अर्धापूर तालुक्यातील ६१ बालकांचा समावेश आहे़ जिल्ह्यात सहा वर्षांखालील बालकांची संख्या २ लाख ७४ हजार ६६६ असून त्यातील वजने घेतलेल्या बालकांची संख्या २ लाख ५५ हजार ९२३ एवढी आहे़ तर कमी वजनाच्या बालकांची संख्या १७ हजार ८४२ एवढी आहे़
या बालकांची दर सहा महिन्याला आरोग्य तपासणी करण्यात येते, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे़ परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये तथ्य किती? हा संशोधनाचा विषय आहे़
नांदेड जिल्ह्यात यापूर्वी किनवट, हदगाव, माहूर, हिमायतनगर या तालुक्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक होते़, परंतु हे तालुके आता कुपोषणमुक्तीकडे वेगाने वाटचाल करीत आहेत़

Web Title: Thirty-four thousand acute malnourished children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.