मादणी येथील तीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:04 AM2021-04-01T04:04:46+5:302021-04-01T04:04:46+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कालभिले यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील शेजारी शेख मुस्ताक यांना सर्वप्रथम ...

Thirty-year-old youth from Madani commits suicide by strangulation | मादणी येथील तीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मादणी येथील तीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण कालभिले यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील शेजारी शेख मुस्ताक यांना सर्वप्रथम गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रवीण कालभिले दिसून आले. त्यांनी तत्काळ नातेवाइकांशी संपर्क साधत माहिती दिली. नातेवाइकांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अजिंठा पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल केले. त्यांनी तत्काळ प्रवीण यांना अजिंठा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनाजी खंडारे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी याच रुग्णालयात झाली. त्यानंतर नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार नीलेश सिरस्कर, कौतीक चव्हाण हे करीत आहेत. प्रवीण यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Web Title: Thirty-year-old youth from Madani commits suicide by strangulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.