'चायना मेड'वर वरचढ ठरताय 'मेड इन छत्रपती संभाजीनगर'चे नावीन्यपूर्ण आकाशकंदील

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 2, 2023 06:24 PM2023-11-02T18:24:45+5:302023-11-02T18:55:46+5:30

यंदा राख्यांपाठोपाठ आकाशकंदीलही आपल्या छत्रपती संभाजीनगरात तयार झाले आहेत.

This year 'Made in Chhatrapati Sambhajinagar' 3D sky lantern will be eye catching | 'चायना मेड'वर वरचढ ठरताय 'मेड इन छत्रपती संभाजीनगर'चे नावीन्यपूर्ण आकाशकंदील

'चायना मेड'वर वरचढ ठरताय 'मेड इन छत्रपती संभाजीनगर'चे नावीन्यपूर्ण आकाशकंदील

छत्रपती संभाजीनगर : सर्वांना आता दिवाळीचे वेध लागले आहेत. बाजारपेठेत फेरफटका मारला, तर अनेक दुकानांसमोर नावीन्यपूर्ण असंख्य आकाशकंदील लटकलेले पाहण्यास मिळत आहेत. बाजारातून हळूहळू ‘चायना मेड’ आकाशकंदील गायब होत असून, मुंबई, कोलकात्यामध्ये तयार झालेले आकाशकंदील बाजारात आले आहेत. यात अभिमानाची बाब म्हणजे यंदा राख्यांपाठोपाठ आकाशकंदीलही आपल्या छत्रपती संभाजीनगरात तयार झाले आहेत.

दरवर्षी जरा हटके खरेदीदारांसाठी ‘थ्रीडी आकाशकंदील’ बाजारात आले आहेत. थ्रीडी ॲम्बास पेपर लावण्यात आला आहे. चमकीदार, पारदर्शक हा पेपर विविध रंगांत आहे. या आकाशकंदिलात लाइट लावला की ‘थ्री डी’सारखा इफेक्ट जाणवतो.

आकाशकंदिलावर अवतरले शिवाजी महाराज
ॲक्रिलिक आकाशकंदिलावर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र बघण्यास मिळत आहे. त्याशिवाय गणपती, विठोबा, माउली, तानाजी, मोर यांचीही चित्रे लावण्यात आली आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या आकाशकंदिलाला जास्त मागणी आहे.

फोटो फ्रेमचे आकाश आकाशकंदील
यंदा फोटो फ्रेमपासून तयार केलेले आकाशकंदील बाजारात दिसत आहेत. लाकडी फ्रेमचा खुबीने वापर करण्यात आला आहे. याशिवाय एमडीएफ लाकडी शीट, पीव्हीसी मटेरिअलचा वापर केला आहे. चांदणी, शंख, अष्टकोनी, बटरफ्लाय, अशा ८० ते १०० डिझाइनचे आकाशकंदील उपलब्ध आहेत.

१ कोटीचे आकाशकंदील बाजारात
१ कोटीचे आकाशकंदील आले आहेत. लक्ष्मीपूजनापर्यंत या आकाशकंदिलांची विक्री होईल. कारण, खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात आकाशकंदील व फटाके खरेदी केले जातात.

काय आहेत किमती? बाजारात ५ इंच ते १८ इंचादरम्यान आकाशकंदील उपलब्ध आहेत.
आकार किंमत
१) नॅनो आकार ३६ ते ३०० रुपये (डझन)
२) मध्यम आकार ६० ते ९०० रुपये (प्रतिनग)
३) मोठा आकार ५०० ते १५०० रुपये (प्रतिनग)

पारंपरिक आकाशकंदिलात नावीन्य
छत्रपती संभाजीनगरातील महिलांनी पारंपरिक आकाशकंदिलात नावीन्य आणले आहे. यात वृंदावन, पेशवाई आकाशकंदील जरदोजी, एम्ब्राॅयडरी, चटाई, ज्यूट यांचा वापर करण्यात आला आहे. यातही पॅचेस, कापडी, लेस, कार्ड बोर्डचा वापर केला आहे.
-राहुल गुगळे, होलसेल व्यापारी

Web Title: This year 'Made in Chhatrapati Sambhajinagar' 3D sky lantern will be eye catching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.