यंदा ‘नॅनो कॉम्प्रेसर’ मशीनमधून उडविला जाणार रंग; अतिवेगाने ४० फुटांपर्यंत रंगांची उधळण

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 16, 2024 03:54 PM2024-03-16T15:54:31+5:302024-03-16T15:57:39+5:30

यंदाच्या धुळवडचे आकर्षण असलेले नॅनो कॉम्प्रेसर उत्तर प्रदेशातील हाथरस येथून शहरात विक्रीला आले आहेत.

This year the colors to be blown from the 'Nano compressor' machine; Blasts colors up to 40 feet at high speed | यंदा ‘नॅनो कॉम्प्रेसर’ मशीनमधून उडविला जाणार रंग; अतिवेगाने ४० फुटांपर्यंत रंगांची उधळण

यंदा ‘नॅनो कॉम्प्रेसर’ मशीनमधून उडविला जाणार रंग; अतिवेगाने ४० फुटांपर्यंत रंगांची उधळण

छत्रपती संभाजीनगर : अवघ्या काही दिवसांवर धुलिवंदन येऊन पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध आकाराच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. कुतुहलाची बाब म्हणजे, दुकानात पिचकऱ्यांसोबत ‘नॅनो कॉम्प्रेसर’ही बघण्यास मिळत आहे. हे कॉम्प्रेसर काही हवा भरण्यासाठी नाही, तर अतिवेगाने रंग दूरपर्यंत उडविण्यासाठी शहरात पहिल्यांदाच अशा कॉम्प्रेसरचा वापर होणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी या नॅनो कॉम्प्रेसरने कोणी रंग उडवत असले तर वावगे वाटायला नको.

कुठून आले नॅनो कॉम्प्रेसर
यंदाच्या धुळवडचे आकर्षण असलेले नॅनो कॉम्प्रेसर उत्तर प्रदेशातील हाथरस येथून शहरात विक्रीला आले आहेत. आजघडीला शहरात असे १ हजार कॉम्प्रेसर आणण्यात आले आहे.

४० फुटांपर्यंत उडतो रंग
साधारण पिचकरीतून ५ ते १० फुटांपर्यंत पाण्याचा रंग उडू शकतो. मात्र, बाजारात आलेल्या नॅनो कॉम्प्रेसरचे नोझल दाबताच ४० फुटांपर्यंत अतिवेगाने रंग उडू शकतो. त्यास डबल जेट हायस्पीड नॉन टॉक्सिक कलर वापरण्यात आला आहे. दोन तोटीतून दोन वेगवेगळे रंग एकाच वेळी उडू शकतात.

रंग उडविण्यासाठी ५ हजार सिलिंडर दाखल
नॅनो कॉम्प्रेसरप्रमाणेच शहरात ५ हजार सिलिंडर दाखल झाले आहेत. अग्नीरोधक सिलिंडरसारखे दिसणाऱ्या या नॅनो सिलिंडरचे नोझल दाबताच सुमारे ३० फूट लांबपर्यंत वेगाने रंग फेकला जातो. या सिलिंडरला छोटे मीटरही बसविण्यात आले आहे. त्यात ७ रंग उपलब्ध झाले आहेत. या सिलिंडरमधील लिक्वीड रंग संपला की, पुन्हा भरता येत नाही.

२ ते ६ लिटरपर्यंतचे सिलिंडर
बाजारात रंग उडविण्यासाठी जे सिलिंडर आले आहेत, त्यात २ लिटर, ३ लिटर, ४ लिटर, ६ लिटरच्या सिलिंडरचा समावेश आहे. ७५० रुपये ते अडीच हजार रुपयांपर्यंत या सिलिंडरची किंमत आहे.

पिचकऱ्याही आता ‘आयएसआय’ मार्क
बाजारात दाखल झालेल्या पिचकऱ्यांमध्ये काही कंपन्यांनी ‘आयएसआय’ चिन्ह रेखांकीत केले आहे. खेळणी गुणवत्ता नियंत्रणात सार्वजनिक आरोग्याचा विचार करण्यात आला आहे. मेड इन इंडिया ते ‘आयएसआय’ मार्क हा मागील पाच वर्षातील पिचकरीचा प्रवास असून पुढील वर्षी बहुतांश पिचकऱ्यांवर ‘आयएसआय’ मार्क दिसून येईल.
- राहूल गुगळे, पिचकरी वितरक

Web Title: This year the colors to be blown from the 'Nano compressor' machine; Blasts colors up to 40 feet at high speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.