यावर्षी विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का घसरला

By योगेश पायघन | Published: September 30, 2022 06:39 PM2022-09-30T18:39:18+5:302022-09-30T18:40:16+5:30

यावर्षी १५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश, गेल्यावर्षी २०४ विद्यार्थ्यींनी दिली होती पसंती

This year, the percentage of admission of foreign students to the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university fell | यावर्षी विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का घसरला

यावर्षी विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा टक्का घसरला

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकतीच पदव्युत्तर प्रवेश झाले. यात विदेशी विद्यार्थ्यांचा यावर्षी टक्का घसरला आहे. यावर्षी ३१७ विदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात केवळ १५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या ५० ने घटली आहे.

परदेशी भाषा विभागाच्या माध्यमातून विदेशी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रीया राबवली जाते. या विद्यार्थ्यांत समन्वयाचे काम डाॅ. विकास कुमार बघतात. विदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांचेही या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष असते. मात्र, गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर यावर्षी टक्का वाढेल असे वाटत असतांना यावर्षी विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण घटले आहे. या विद्यार्थ्यांकडून एम.कॉम, एम.बी.ए आदी अभ्यासक्रमांना अधिक पसंती दिली जाते. कोरोना व विदेशी शिक्षणाच्या बदलत्या धोरणातील अटींमुळे अनेक विदेशी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पाठ फिरवल्याने यावर्षी संख्या रोडावली आहे.

येमेनचे सर्वाधिक विद्यार्थी...
विद्यापीठात अफगाणिस्थान १, बांगलादेश १, इजिप्त ३, इथोपिया २, मंगोलिया १, ओमान १, पेलेस्टाईन ४, सौदी अरेबिया १, सुदान २१, युएसए १, येमेन ११६ असे एकुण १५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विदेशी विद्यार्थ्यांचा ओघ वाढीसाठी प्रयत्न करू
अरेबियन देशांतून विद्यापीठात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. कोरोना काळात आलेले निर्बंध आणि अटींमुळे यावर्षीच्या प्रवेशावर परीणाम झाला. आता अनेक अटी केंद्र शासनानेही शिथिल केल्या असून या प्रक्रीयेत समनव्य वाढवून पुढील वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल यासाठी प्रयत्न करू.
-डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

शैक्षणिक वर्ष - विदेशी विद्यार्थी प्रवेश
२०२०-२१ -११४
२०२१-२२-२०४
२०२२-२३ -१५४

Web Title: This year, the percentage of admission of foreign students to the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.