विद्यापीठात यावर्षीच्या राज्य क्रीडा महोत्सवाचे ३ ते ७ डिसेंबर दरम्यान आयोजन
By योगेश पायघन | Published: September 15, 2022 12:32 PM2022-09-15T12:32:25+5:302022-09-15T12:33:00+5:30
२० विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा असेल सहभाग
औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव ३ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धांचे आयोजन दिमाखदार व सोयींयुक्त करू असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ठ केले.
राज्यपालांनी यावर्षीचे राज्य क्रीडा महोत्सवाचे यजमानपद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. या स्पर्घेत राज्यातील २० विद्यापीठांचे खेळाडु होणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाची बैठक बुधवारी कुलगुरु डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठाला क्रीडा व दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
बैठकीस प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ. संदिप जगताप, डॉ. उदय डोंगरे, डॉ. कल्पना झरीकर, चंद्रशेखर धुगे, डॉ.शत्रुंजय कोटे, डॉ. चंद्रजीत जाधव, संचालक डॉ. दयानंद कांबळे, ‘साई’चे संतोष कुमार आदींची उपस्थिती होती. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, बास्कटेबॉल, व्हॉलीबॉल व अॅथॅलेटिक्स या स्पर्धा होणार आहेत.
क्रीडा संचालकपदी डॉ. दयानंद कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी क्रीडा संचालकपदी डॉ.दयानंद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुंनी राज्य क्रीडा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही नियुक्ती केली. डॉ. कांबळे हे दोन दशकांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून सरस्वती भवन महाविद्यालात क्रीडा संचालकपदी कार्यरत आहेत.