आरोग्यात स्वच्छतेचा ‘थोरात पॅटर्न’

By Admin | Published: November 2, 2015 12:01 AM2015-11-02T00:01:54+5:302015-11-02T00:18:45+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड केज सारख्या ग्रामीण भागातील तालुक्याला उपजिल्हा रूग्णालयात नौकरी करण्यास देखील डॉक्टर नाकडोळे मोडतात.उपलब्ध साधन-सुविधांचा मोठ्या कौशल्याने वापर करून

'Thorat Pattern' for Cleanliness in Health | आरोग्यात स्वच्छतेचा ‘थोरात पॅटर्न’

आरोग्यात स्वच्छतेचा ‘थोरात पॅटर्न’

googlenewsNext


व्यंकटेश वैष्णव , बीड
केज सारख्या ग्रामीण भागातील तालुक्याला उपजिल्हा रूग्णालयात नौकरी करण्यास देखील डॉक्टर नाकडोळे मोडतात.उपलब्ध साधन-सुविधांचा मोठ्या कौशल्याने वापर करून आरोग्याच्या क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप पाडणयाचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे डॉ. अशोक थोरात यांनी सरकारी रूग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलून राज्यात केजच्या आरोग्य विभागाने थोरात पॅटर्न ची छाप पाडली आहे.
तीस हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या केज तालुक्यात दीड वर्षांपूर्वी आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला होता. केज येथे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय आहे. याठिकाणी पूर्वी १४ टक्के रूग्ण दाखल असायचे. या परिस्थितीत डॉ. अशोक थोरात यांनी सोळा महिन्यांपूर्वी केजच्या रूग्णालयाचा पदभार स्वीकारला. रूग्णालयाच्या विकासाबाबत सांगताना ते म्हणाले की, मी २१ मे २०१४ रोजी केजच्या उप जिल्हा रूग्णालयाचा पदभार स्विकारला अन् केज सारख्या ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचा निश्चय केला. १०० खाटांच्या रूग्णालयात केवळ १४ ते १५ पेशंन्ट दाखल असायचे. मी जेव्हा केजच्या उप जिल्हा रूग्णालयाचा पदभार घेतला, तेव्हा बाह्य रूग्णांची (ओपीडी) ७३ हजार ३०८ एवढी होती. येणाऱ्या रूग्णांची समस्या, मिळणाऱ्या सुविधा यामध्ये वाढ केली. रूग्णाला रेफर करण्यापेक्षा जबाबदारीने केज येथेच संबंधीत रूग्णाला उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले. याचाच परिणाम आज घडीला १ लाख १२ हजार ९६५ एवढी ओपीडी (महिन्याकाठी) वाढली आहे. रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना देखील ओळखपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खासदारांनी घेतली दखल
केज येथील उप जिल्हा रूग्णालयात डॉ. अशोक थोरात यांनी केलेले कार्याची खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील स्तुती केली. एवढेच नाही तर दहा लाख रूपये विकास निधी मंजूर केला आहे.
शासकीय रूग्णालय म्हटले की, स्वत: ला उच्चभू्र समझणारे नाक मुरडतात. मात्र आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सकारात्मक दुष्टीकोणातून आरोग्य सेवा अधिक क्षमतेने सर्वसामान्यांपर्यंत पोहचविता येऊ शकते. याचे उदाहरण केज येथील उप जिल्हा रूग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक थोरात यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. केज येथे आरोग्यसेवेत थोरात पॅटर्न प्रभावी ठरत आहे. या कार्यासाठी डॉ. थोरात यांच्या मदतीला डॉ. वासूदेव नेहारकर, डॉ. प्रतिभा थोरात, डॉ. अरूणा केंद्रे, विष्णू घुगे, अजर शेख, चेतन आदमाने, दिगाबंर मुंडे, बालासाहेब सोळंके यांचे सहकार्य होत असल्याचे डॉ. थोरात म्हणाले.

Web Title: 'Thorat Pattern' for Cleanliness in Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.