नगररोडवर वाहनांची कसून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:04 AM2021-04-24T04:04:31+5:302021-04-24T04:04:31+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे परजिल्ह्यातून तसेच शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची वाळूज महानगर परिसर व नगररोडवर ...
सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे परजिल्ह्यातून तसेच शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनांची वाळूज महानगर परिसर व नगररोडवर कसून तपासणी करण्यात येत आहे. औरंगाबाद-नगर महामार्गावर वाळूज पोलीस ठाण्यासमोर बॅरिकेट्स व शामियाना उभारून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. वाळूजच्या रामराई रोड, पंढरपुरातील तिरंगा चौक, कामगार चौक, मोरे चौक, मोहटादेवी चौक, रांजणगाव फाटा तसेच साऊथ सिटीतील लष्कराच्या नाक्यावरील वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, एमआयडीसीचे निरीक्षक मधुकर सावंत, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके, सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक सचिन पागोटे, राजेंद्र बांगर, सतीश पंडित, राहुल निळ, प्रीती फड, लक्ष्मण उंबरे, पोहेकॉ. पांडुरंग शेळके, पोकॉ. प्रदीप बोरुडे आदींकडून नाकाबंदी केली जात आहेत.
फोटो ओळ
वाळूज महानगर व नगररोडवर पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
--------------------------