त्या पालकांनी कुठलेही शुल्क भरू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:02 AM2021-06-20T04:02:56+5:302021-06-20T04:02:56+5:30
खुलताबाद : सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. अतंर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची ...
खुलताबाद : सन २०२१ - २२ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. अतंर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली आहे. पालकांनी आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घेत्या वेळी कुठलीही प्रवेश शुल्क अथवा फी देऊ नये. यासह काही अडचण असल्यास पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सचिन सोेळंकी यांनी केले आहे.
या प्रक्रियेतंर्गत संबंधित शाळांना आरटीई पोर्टलवर यादी प्राप्त झाली असून त्यातील पात्र विद्यार्थ्याना प्रवेश घेण्यासाठी पालकांना आरटीई पोर्टलवरून मेसेज शाळा स्तरावरून पाठविण्यात आला आहे. ज्या मुलांचा नंबर लावला त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती संबंधित शाळेत जमा करून आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. यासंदर्भात संबंधित शाळांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया करत तशा सूचना शाळेच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात. आरटीईमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून शाळांनी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नयेत असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी संपल्यानंतर शाळेतील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशपात्र सर्व पालकांनी तात्काळ आपल्या पाल्यांना प्रवेश मिळालेल्या शाळांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावेत तसेच यादरम्यान संबंधित शाळा स्तरावर कुठलीही अडचण, अडवणूक आल्यास तात्काळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे अवाहन गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी यांनी केले आहे.