सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 03:53 PM2018-11-13T15:53:39+5:302018-11-13T15:54:59+5:30

ज्या मालमत्तांना कर लावून घ्यावयाचा आहे त्यांच्या मालमत्तांना अद्याप कर आकारलेला नाही.

Thousands of buildings in Satara-Devlai are out of tax cover | सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच

सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सोमवारपासून मोहीम हाती घेतली आहे; परंतु ज्या मालमत्तांना कर लावून घ्यावयाचा आहे त्यांच्या मालमत्तांना अद्याप कर आकारलेला नाही. अशा मालमत्तांची कर वसुली करणार कशी, असा सवाल  उपस्थित केला जात आहे. 

मालमत्तेला कर लावून घ्यावा म्हणून महापालिकेने मोहीम राबविली असली तरी एका सदनिकेचा दुसरा, तिसरा व्यवहार झाला आहे. त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी ठराविक कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. ज्यांना महापालिकेच्या पथकाने सर्व्हे करून नोटिसा पाठविल्या आहेत असे सदनिकाधारक मनपा वॉर्ड कार्यालयात जाऊन कराचा भरणा करीत आहेत; परंतु ज्यांच्या मालमत्तांची मनपाकडे नोंदच नाही, सरदार इन्क्लेव्हसह इतर इमारतींना रो-हाऊसची बहुतांश घरांना मालमत्ता कर आकारण्यात आलेला नाही.  

स्वतंत्र यंत्रणेद्वारे कर लावा
परिसरातील प्रत्येक नागरिकाला मालमत्ता कर लावून मिळावा त्यासाठी मनपाने स्वतंत्र शिबीर घेण्याची गरज आहे. काही नागरिकांनी फक्त गुंतवणूक म्हणून फ्लॅट, घर, रो हाऊस घेतले असले तरी त्या इमारतीला मालमत्ता कर आकरलेलाच नाही. 

Web Title: Thousands of buildings in Satara-Devlai are out of tax cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.