गॅस्ट्रोने हजारो नागरिक बाधित : छावणी परिषदेतील कर्मचाºयांचीच चुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:27 AM2018-01-07T00:27:09+5:302018-01-07T00:28:13+5:30

नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनातही गाजले होते. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीने परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी.के. पात्रा यांना सोपविलेल्या अहवालावर परिषदेच्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) झालेल्या ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.

Thousands of citizens of Gastroen were disrupted: The staff of the camp was not the only one | गॅस्ट्रोने हजारो नागरिक बाधित : छावणी परिषदेतील कर्मचाºयांचीच चुकी

गॅस्ट्रोने हजारो नागरिक बाधित : छावणी परिषदेतील कर्मचाºयांचीच चुकी

googlenewsNext
ठळक मुद्देसत्यशोधन समितीच्या अहवालानंतर बैठकीत निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरण विधानसभेच्या अधिवेशनातही गाजले होते. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीने परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर डी.के. पात्रा यांना सोपविलेल्या अहवालावर परिषदेच्या शनिवारी (दि. ६ जानेवारी) झालेल्या ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या कर्मचाºयांच्या चुकीमुळेच गॅस्ट्रोने हजारो लोक बाधित झाल्याचा सकृतदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला. मात्र, संबंधितांवर काय कारवाई करावी, यासंदर्भात कायदेशीर सल्ला आणि योग्य ती प्रक्रिया पूर्ण करूनच येत्या १०-१५ दिवसांत ठरविले जाईल, असे अध्यक्ष ब्रिगेडियर पात्रा यांनी बैठकीत जाहीर केल्याचे उपाध्यक्ष संजय गारोल आणि इतर नगरसेवकांनी पत्रकारांना सांगितले.
परिषदेने वरील घटनेसंदर्भात उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली होती. समितीमध्ये नगरसेवक किशोर कच्छवाह, एजीई कर्नल शर्मा, आनंद शर्मा आणि परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर हे सदस्य होते. सविस्तर चौकशीअंती त्यांनी अध्यक्षांकडे अहवाल सोपविला होता. त्यावर आजच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली.
याशिवाय छावणीतील पाच वॉर्डांतील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय आणि इतर प्रशासकीय निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्ष संजय गारोल, नामीत सदस्य एजीई कर्नल शर्मा, तसेच सदस्य प्रशांत तारगे, किशोर कच्छवाह, पद्मश्री जैस्वाल, शेख हनीफ शेख इब्राहीम,मिर्जा रफतुल्ला बेग आणि प्रतिभा काकस उपस्थित होते. सीईओ नायर यांनी कार्यवाहीची नोंद घेतली. त्यांना ओएस वैशाली केणेकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Thousands of citizens of Gastroen were disrupted: The staff of the camp was not the only one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.