औरंगाबाद शहर पोलीस दलातील हजारजणांच्या अंतर्गत बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 01:10 PM2022-05-25T13:10:54+5:302022-05-25T13:11:24+5:30

या बदल्यांपैकी काहींच्या प्रशासकीय कारणास्तव, तर काहींच्या बदल्या विनंती स्वरूपाच्या आहेत.

Thousands of internal transfers in Aurangabad city police force | औरंगाबाद शहर पोलीस दलातील हजारजणांच्या अंतर्गत बदल्या

औरंगाबाद शहर पोलीस दलातील हजारजणांच्या अंतर्गत बदल्या

googlenewsNext

औरंंगाबाद : शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस शिपाई पदावरील सुमारे १ हजारांवर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले.

या बदल्यांपैकी काहींच्या प्रशासकीय कारणास्तव, तर काहींच्या बदल्या विनंती स्वरूपाच्या आहेत. औरंगाबाद शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू होती. बदलीपात्र प्रत्येक कर्मचाऱ्यांना रिक्त पदे आणि पाेलीस कर्मचाऱ्यांची पसंती यांची सांगड घालून पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी स्वत: या बदल्या केल्या. यात जिल्हा बदलीने येथे रुजू झालेल्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. शहर पोलीस दलातील एकाच पोलीस ठाण्यात अथवा अन्य ठिकाणी पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.

या बदल्या करण्यापूर्वी प्रशासनाने कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीचे ठाणे अथवा अन्य ठिकाणाची माहिती लेखी स्वरूपात घेतली होती. यानंतर प्रत्यक्ष बोलावून पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणींचाही बदली करताना विचार करण्यात आला. सहायक फौजदार, हवालदार आणि अंमलदार या पदांवरील ८३७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; तर विविध ठिकाणी कार्यरत असताना कामात निष्काळजीपणा करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव मुख्यालयात बदली करण्यात आली; तर क्यूआरटी पथकातील २१ कर्मचाऱ्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. तसेच दंगा काबू पथकातील ५५ कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या करण्यात आल्या. यासोबतच मोटार परिवहन शाखेतील ९९ वाहनचालकांच्या बदल्या करण्यात आल्या.

जिल्हा बदलीने आले ३० कर्मचारी
राज्यातील रत्नागिरी, बृहन्मुंबई, अमरावती, जालना, वर्धा, उस्मानाबाद आदी ठिकाणी भरती झालेल्या ३० कर्मचारी जिल्हा बदलीद्वारे औरंगाबाद शहर पोलीस दलात रुजू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनाही पदस्थापना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Thousands of internal transfers in Aurangabad city police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.