हजार विहिरी रखडल्या !

By Admin | Published: November 19, 2015 12:10 AM2015-11-19T00:10:12+5:302015-11-19T00:24:54+5:30

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून,

Thousands of wells stuck! | हजार विहिरी रखडल्या !

हजार विहिरी रखडल्या !

googlenewsNext


सितम सोनवणे , लातूर
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून, सध्याला तब्बल २ हजार २१५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. नव्हे, या विहिरी रखडल्या आहेत. या विहिरी झाल्या असत्या तर टंचाईच्या काळात मदत झाली असती.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यात २००८ पासून विविध कामे सुरु करण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, रस्ता आदी कामे सुरु करण्यात आली होती़ मागील ७ वर्षांत लातूर जिल्ह्यात ५ हजार ८२७ सिंचन विहीर खोदकामास परवानगी देण्यात आली़ यातील केवळ ३ हजार ६१२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत़ तर २२१५ विहिरींचे कामे अद्यापही अपूर्णच आहेत़ या अपूर्ण कामामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४४ विहिरींची कामे सुरु केले होते़ त्यापैकी ३१४ विहिरी पूर्ण झाल्या़ तर २०३ विहिरी अपूर्ण आहेत़ औसा तालुक्यात ५०७ पूर्ण तर ४०५ अपूर्ण, चाकूर - २६० पूर्ण तर २५८ अपूर्ण, देवणी १८२ पूर्ण तर ४९० अपूर्ण, जळकोट २८१ पूर्ण तर ११६ अपूर्ण, लातूर ३८७ पूर्ण तर १५६ अपूर्ण, निलंगा ४५० पूर्ण तर १९० अपूर्ण, रेणापूर ३४४ पूर्ण तर ६६ अपूर्ण, शिरुर अनंतपाळ १५१ पूर्ण तर १५४ अपूर्ण, उदगीर ७०९ पूर्ण तर १७७ अपूर्ण आहेत़ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची व्यवस्था होईल़

Web Title: Thousands of wells stuck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.