तरुणाला धमकावत तोतया पोलिसाने दुचाकी व मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:01 PM2021-01-11T20:01:12+5:302021-01-11T20:01:22+5:30
मी वाहतूक शाखेचा पोलिस आहे असे म्हणत दुचाकीची चावी काढून घेतली.
वाळूज महानगर : वाहतुक शाखेचा पोलिस कर्मचारी असल्याची बतावणी करुन मित्राला सोडुन येतो, असे म्हणून दुचाकी व मोबाईल लांबविणाऱ्या तोतया पोलिसाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशव बळीराम ढगे (रा.रांजणगाव) यास बुधवारी (दि.६) शहरातून औषधी घेयची असल्याने त्याने आपला मित्र अमोल निकाळजे (रा.वडगाव) याची दुचाकी मागवुन घेतली होती. अमोल याने दुचाकी (क्रमांक एम.एम.२०,एफ.एस.५१४५) दिल्यानंतर केशव हा औषधी आणण्यासाठी शहरात गेला. घरी परत येत असतांना ए.एस.क्लबजवळ रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट परिधान केलेल्या एका अनोळखी इसमाने केशवला अडवले. तुला सिग्नल दिसत नाही का ? तु सिग्नल तोडले आहे. मी वाहतूक शाखेचा पोलिस आहे असे म्हणत दुचाकीची चावी काढून घेतली. यानंतर केशवचा मोबाईल व बटवा काढून घेत साथीदाराकडे दिले.
यानंतर त्याने मित्राला सोडून येतो, असे म्हणत तो दुचाकी, मोबाईल व बटवा घेऊन साथीदारासह निघून गेला. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच केशव ढगे याने आज सोमवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी तोतया पोलिस व त्याच्या साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना.जाधव हे करीत आहेत.