दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपी पकडले
By Admin | Published: November 2, 2015 12:03 AM2015-11-02T00:03:21+5:302015-11-02T00:19:36+5:30
बीड : केज-धारूर रोडवर एका व्यापाऱ्याला जीपमध्ये मारहाण करून लुटल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे
बीड : केज-धारूर रोडवर एका व्यापाऱ्याला जीपमध्ये मारहाण करून लुटल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाला यश आले असून, त्यांनी या प्रकरणी तिघांना पकडले असून, उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
धारूर येथील व्यापारी महेश दिलीपराव रूद्रवार हे २७ आॅक्टोबर रोजी केज येथून धारूरकडे जाण्यासाठी थांबले असता त्या ठिकाणी एक जीप आली. जीप धारूरला जात असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे ते त्या जीपमध्ये बसले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर पाच जणांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाईल, नगदी व गळ्यातील सोन्याचे लॉकेट असा १ लाख २३ हजार ९५० रूपयांचा ऐवज जबरीने लुटला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सी. डी. शेवगण व दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी यांनी त्या जीपचा शोध घेतला. परळी बसस्थानकाजवळ सापळा लावून जीप (एमएच २४ सी ७१३९) सह तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ही जीप चोरीची असून, ती पुणे येथून चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली. इतर दोघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई सपोनि पुंडगे, देशपांडे, धुळे, पोउपनि कांबळे, अकबर, जगताप, कुहारे आदींनी केली. (प्रतिनिधी)