वृद्ध महिलेची साडेतीन तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:10 PM2019-06-10T23:10:36+5:302019-06-10T23:10:55+5:30

मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास कोटला कॉलनीजवळील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) हॉलजवळ घडली. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

 The three-and-a-half-year-old son of the old lady snatched the two-wheeler bogey | वृद्ध महिलेची साडेतीन तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावली

वृद्ध महिलेची साडेतीन तोळ्याची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावली

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतीचौक ठाण्यात गुन्हा: आयएमए हॉलजवळील घटना

औरंगाबाद : मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास कोटला कॉलनीजवळील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए ) हॉलजवळ घडली. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, शांतीनिकेतन कॉलनीतील रहिवासी रोहिणी बळवंतराव लाखकर (६७) या नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी घराच्या परिसरात फिरायला गेल्या होत्या. साडेसात ते आठच्या सुमारास त्या आयएमए हॉलजवळून जात असताना दुचाकीस्वार दोन जण त्यांच्याजवळून पुढे गेले. यानंतर तेच पुन्हा फिरून विरुद्ध दिशेने त्यांच्यासमोर आले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने रोहिणी यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावून घेतली. यावेळी रोहिणी यांनी आरडाओरड केली. मात्र, लोक त्यांच्या मदतीला येईपर्यंत चोरटे धूमस्टाईलने तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक, सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची चौकशी सुरू केली.

आरोपी सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
आरोपी हे काळ्या रंगाच्या मोटारसायकलने आले होते. सकाळी पोलीस रस्त्यावर नसतात यामुळे आरोपींनी हेल्मेट दुचाकीला लटकविले होते. दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेºयात दोन्ही संशयित दुचाकीसह कैद झाले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

गस्त वाढविली तरीही मंगळसूत्र चोरी
मंगळसूत्र चोरी आणि नागरिकांच्या पैशाच्या बॅगा हिसकावून नेण्याच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना गस्त वाढविण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार प्रत्येक ठाण्यातील बीट हवालदार, पीसीआर मोबाईल कार आणि गुन्हे शाखेचे साध्या वेशातील पोलीस पहाटे ५ ते ११, ११ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ९ यावेळेत कालावधी गस्तीवर आहेत.

Web Title:  The three-and-a-half-year-old son of the old lady snatched the two-wheeler bogey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.