एटीएममधील १४ लाख रुपये काढून घेणाऱ्या तिघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:05 AM2021-07-30T04:05:06+5:302021-07-30T04:05:06+5:30
------------------------------------------------ दुचाकी चोराला पोलीस कोठडी औरंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करून उभी केलेली दुचाकी चोरणारा आकाश संतोष सरोदे याला ...
------------------------------------------------
दुचाकी चोराला पोलीस कोठडी
औरंगाबाद : घरासमोर हॅन्डल लॉक करून उभी केलेली दुचाकी चोरणारा आकाश संतोष सरोदे याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
--------------------------------------------------
स्पेअरपार्ट चोराला पोलीस कोठडी
औरंगाबाद : आविष्कार कॉलनी येथील बॅटमिंट हॉलजवळ उभ्या केलेल्या पिकअप व्हॅनमधून एक लाख २२ हजार ८१० रुपये किमतीचे स्पेअरपार्ट चोरणारा शरिफ उर्फ बाबा रशीद शहा याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
---------------------------------------------
दोघा भोंदूबाबांना पोलीस कोठडी
औरंगाबाद : हातचलाखीने पैसे लांबविणारे योगेश खंडू सोळंके आणि विश्वनाथ नारायण शिंदे या दोघा भोंदूबाबांना ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
मारहाणीच्या गुन्ह्यात दोघांना पोलीस कोठडी
औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी सळई, लाकडी दांडा आणि घावाने जबर मारहाण केल्याच्या गुन्ह्यात आबुजर ऊर्फ राज खान जफर खान आणि अनवर खान ऊर्फ सोनू कादर खान या दोघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी गुरुवारी दिले. सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
--------------------------------------------------
चोराची, सोनाराची हर्सुल तुरुंगात रवानगी
औरंगाबाद : वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावणारा बाळू भागाजी मकळे आणि ती चोरीची सोनसाखळी विकत घेणारा सोनार विजय तनसुखलाल सोनी या दोघांची न्यायालयीन कोठडीत हर्सुल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी गुरुवारी दिले.
-----------------------------------------------------