सिल्लोड तालुक्यात तीन पुल अतिधोकादायक
By Admin | Published: September 13, 2016 06:38 PM2016-09-13T18:38:31+5:302016-09-13T18:38:31+5:30
धकाम विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी सिल्लोड तालुक्यातील धोकादायक पुल किती, कोसळलेल्या पुलाचा दोषी कोण. अशा विविध प्रश्नांची उत्तर देऊन धास्ती मुळे आजारी पडले आहेत.
tyle="text-align: justify;">श्यामकुमार पुरे, ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. १३ - सिल्लोड तालुक्यातील धोकादायक पुलांचा सर्वे करणारे बांधकाम विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी सिल्लोड तालुक्यातील धोकादायक पुल किती, कोसळलेल्या पुलाचा दोषी कोण. अशा विविध प्रश्नांची उत्तर देऊन धास्ती मुळे आजारी पडले आहेत. काही तर मेडिकल सुट्या टाकून मोकळे झाले आहेत.
मोढावाडी च्या कोसळलेल्या पुलाने सोमवारी रात्री एक बळी घेतला. भरधाव वेगाने जाणारा मोटार सायकल स्वार त्यात पडून जागीच ठार झाला. तरी बांधकाम विभागाचे अधिकारी अजूनही जागे झाले नाही.
सिल्लोड तालुकाच नव्हे तर औरंगाबाद जिल्ह्यातील पुलांचा रेकॉर्ड असलेले मोजमाप पुस्तिकाच गहाळ झाल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध चौकशीला सामोरे जावे लागत आहे.या मुळे बहुतेक कर्मचारी अधिकारी आजारी पडले आहे.
सिल्लोड तालुक्यातील तीन पुल अती धोकादायक
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा वाघुर नदीवरील पुल, बंनकिन्होळा , व सिल्लोड भराडी रस्त्या वरील भराडी नाक्यावरील हे तीन पुल अती धोकादायक असल्याची माहिती बांधकाम विभागाने शासनाला दिली आहे.
सिल्लोड तालुक्यात 213 पुल
सिल्लोड तालुक्यात 161 नळ कांडी पुल आहे. तर सलैबचे 13 पुल आहे. छोटे - छोटे पुल 36 आहे.तर मोठे पुल 3 आहेत. या पैकी काही पुलांचा तडका फडकी सर्वे करुण तालुक्यात 3 पुल अती धोकादायक असल्याचे अहवाल वरिष्ठ अधिकारी व शासनाला दिली असल्याची माहिती उपविभागीय अभियंता नामदेव मोघल यांनी दिली.