सख्ख्या भावासह तिघांना दहीपुरीतून अटक

By Admin | Published: September 8, 2014 12:16 AM2014-09-08T00:16:38+5:302014-09-08T00:51:46+5:30

रवी गात , अंबड सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंबड-औरंगाबाद मार्गावर किनगाव चौफुलीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह जाळल्याच्या घटनेचा उलगडा करण्यात गोंदी पोलिसांना अखेर यश आले आहे

The three brothers were arrested from Dahipuri with a big brother | सख्ख्या भावासह तिघांना दहीपुरीतून अटक

सख्ख्या भावासह तिघांना दहीपुरीतून अटक

googlenewsNext


रवी गात , अंबड
सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंबड-औरंगाबाद मार्गावर किनगाव चौफुलीजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह जाळल्याच्या घटनेचा उलगडा करण्यात गोंदी पोलिसांना अखेर यश आले आहे. मागील दोन महिन्यांपासून मयताची ओळख पटत नसताना पोलीसांनी ही अवघड कामगिरी पार पाडली आहे.
या प्रकरणी मयत विष्णू किसन नरवडे यांच्या सख्ख्या भावासह तीन जणांना शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी अंबड तालुक्यातील दहीपुरी येथे छापा टाकून पोलिसांनी ताब्यात घेतले. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मागील दोन महिन्यापासुन कोणताही सुगावा लागत नसताना व मयताची ओळख पटत नसताना पोलीसांनी ही अवघड कामगिरी पार पाडल्याबद्दल सर्वत्र पोलीसांचे कौतुक होत आहे.
पाच दिवसांपूर्वी तीर्थपुरीजवळ बँकेची कॅश लुटण्यात आली. या दरोड्याचा तपास लावण्याचे आवाहन गोंदी पोलीसांसमोर होते. दरोड्याच्या तपासासाठी पोलीसांनी सर्वत्र आपले खबऱ्यांचे जाळे पसरविले. त्याचवेळी पोलिसांना एका खुनाचा सुगावा लागला. पोलिसांनी सुगावा लावताच दहीपुरी गावात वेषांतर करुन आपल्या पोलिसांना पाठविले. पाच-सहा दिवस गावात राहून पोलीसांनी संपूर्ण माहिती काढली.
संपूर्ण माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, विष्णु चव्हाण, रामनाथ मुळक, ए. एस. सोनवणे आदींच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा दहीपुरी येथे छापा टाकून शरद किसन नरवडे या मुख्य आरोपीसह आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना खाकीचा हिसका दाखवताच त्यांनी धक्कादायक माहिती दिली.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार दहीपुरी येथील रहिवासी विष्णू किसन नरवडे याचे दोन लग्न झाले होते. विष्णू यास दारुचे व इतर व्यसन होते. त्याचे पहिले लग्न तालुक्यातील बारसवाडा येथील मुलीशी झाले होते, मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला, यावेळी विष्णु हा काही काम करत नसल्याने त्याचा लहान भाऊ शरद याने घटस्फोटीत पत्नीस पोटगीसाठी ठरलेली रक्कम विष्णू यास दिली. यानंतर काही काळाने विष्णू याने घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथील मुलीशी दुसरे लग्न केले. मात्र अवघ्या दीड महिन्यातच तिने सुध्दा विष्णुच्या वागणुकीस कंटाळून जाळून घेतले.
यावेळीही विष्णूचा भाऊ शरद याने जळीत भावजयीच्या उपचारासाठी व इतर गोष्टींसाठी मोठा खर्च केला. मागील काही महिन्यांपासून विष्णूने पुन्हा एकदा आपल्याला लग्न करायचे असल्याचे घरी सांगितले.
आधीच घडलेल्या दोन प्रकरणामुळे तसेच दारु व इतर व्यवसनामुळे शरद हा आपल्या भावाच्या वागणुकीस कंटाळला होता. विष्णूने स्वत:च्या लग्नासाठी तगादा लावताच शरद याने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी त्याने आपल्या मित्रांची मदत घेण्याचेही ठरविल्याची माहिती पोलीसांनी दिली.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी शरद याने शेतात दाळबट्टीचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी शरद याने आपला भाऊ विष्णू याच्यासह आपले मित्र राजू बाबुराव कनके (२०), रामदास तुकाराम नरवडे (१९), सुनील विठ्ठल नरवडे(२०) व राजू त्र्यबंक नरवडे(२२)(सर्व रा.दहीपुरी ता.अंबड) यानांही शेतात बोलावले. सर्वांनी एकत्र मद्यप्राशन केले. मद्यप्राशनानंतर शरद याने आपल्या मित्रांसह विष्णू याचा गळा आवळून तसेच तोडांत माती कोंबून खून केला.
पऱ्हाटीच्या फासावर जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
यानंतर शरद याच्या दुचाकीवर ( एम.एच.२१ ए.एल.४६३७) विष्णूचे प्रेत बसविले. त्याच्या पाठीमागे रामदास व राजू दोघे प्रेत धरुन बसले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास सर्वजण दुचाकीने दहीपुरी येथून अंबड जवळील महालक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात आले. तेथे त्यांनी एका दुकानासमोरुन सिमेंटची रिकामी गोणी घेतली. यानंतर सर्वजण प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठीच्या योग्य जागेच्या शोधात औरंगाबादला जाणाऱ्या मार्गाने निघाले. किनगांव चौफुली येथील वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला त्यांना कापसाचा फास दिसला. दुचाकीतुन पेट्रोल काढून प्रेत पेटवून दिले. प्रेत व्यवस्थित जळाल्याची खात्री करुन सर्वजण दहीपुरी येथे परतले. दुसऱ्या दिवशी शरदने आपला भाऊ विष्णू हा कामाच्या शोधात पुणे येथे गेल्याचे सर्वांना सांगितले.

Web Title: The three brothers were arrested from Dahipuri with a big brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.