ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:05 PM2019-05-17T16:05:28+5:302019-05-17T16:07:17+5:30

बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात

three children arrested who break shops for branded clothes and addiction | ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात

ब्रॅण्डेड कपडे आणि नशेसाठी दुकाने फोडणारी तीन मुले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दुकानांचे शटर उचकटून ४१ हजार रुपये रोख आणि मोबाईल चोरला गांजा ओढण्याचे व्यसन आणि महागडे कपडे घालण्यासाठी चोरी केल्याचे उघड

औरंगाबाद : ब्रॅण्डेड कपडे, बूट आणि गॉगल, तसेच नशा करण्यासाठी दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना (विधिसंघर्षग्रस्त बालक) पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलांनी पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, गारखेडा, खुलताबाद आदी ठिकाणी दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याची कबुली दिली. 

याविषयी अधिक  माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, १४ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास कामगार चौकातील सुरेश पंडितराव कचकुरे यांच्या मालकीचे साईबाबा डेली नीडस् आणि विष्णू भगवान सोनवणे यांच्या मालकीचे टेस्टी राईट, तसेच चंद्रकांत सुधाकर चव्हाण यांचे भक्ती कलेक्शन या तीन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी ४१ हजार रुपये रोख आणि मोबाईल चोरून नेला होता.

याप्रकरणी कचकुरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात १५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद होताच, पोलिसांनी तपास करून बारा तासांत तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यावेळी तिन्ही मुलांच्या अंगावर ब्रॅण्डेड कपडे, गॉगल आणि बूट, चप्पल आदी आढळून आले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता एका मुलाजवळ मोबाईल हॅण्डसेट मिळाला. अधिक चौकशीअंती तो मोबाईल एक दिवसापूर्वी एका दुकानातू चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अंगावरील उच्च दर्जाचे कपडेही चोरीच्या पैशातून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

गांजा ओढण्याचे व्यसन त्यांना जडले असून, गांजाचे व्यसन भागविण्यासाठी आणि चांगले कपडे, बूट खरेदी करण्यासाठी कामगार चौक, पुंडलिकनगर, जवाहरनगर आदी परिसरातील दुकानांचे शटर उचकटून चोऱ्या केल्याचे त्यांनी सांगितले. बारा तासांत आरोपींना अटक करण्याची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, लक्ष्मण हिंगे, विठ्ठल फरताळे, विलास डोईफोडे, जालिंदर मांटे, रवी जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ यांनी एसपीओ बुट्टे, विटेकर आणि बोधक यांच्या मदतीने केली. 

कुख्यात गुन्हेगार उमप चालवितो गँग
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार दादाराव उमप हा अल्पवयीन मुलांची गँग चालवीत असल्याचे समोर आले. लहान मुलांकडून तो चोऱ्या करून घेतो. पोलिसांनी पकडलेली तिन्ही मुले झोपडपट्टीतील रहिवासी आहेत, विशेष म्हणजे गतवर्षी जानेवारी महिन्यात उपनिरीक्षक योगेश धोंडे यांच्या पथकाने या मुलांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती. सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले.

Web Title: three children arrested who break shops for branded clothes and addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.