तीनदिवसीय इंडेक्स्पो उद्योग प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:04 AM2017-11-13T00:04:31+5:302017-11-13T00:04:41+5:30
रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर आयोजित तीनदिवसीय इंडेक्स्पो प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर आयोजित तीनदिवसीय इंडेक्स्पो प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. यामध्ये अभियांत्रिकी आणि उद्योग क्षेत्रातील १२० हून अधिक उद्योगांनी सहभाग घेतला. त्याला नवउद्योजकांसह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
दिला.
समारोपप्रसंगी महापौर नंदकुमार घोडेले, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, सुनील रायठ्ठा, आनंद मिश्रीकोटकर, महेश शहा, शिरीष खंडारे, हर्षवर्धन जैन, अरुण पाटणी यांची उपस्थिती होती. शहरातील उद्योगांना चालना मिळण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले. इंडेक्स्पो हा उपक्रम देशभर राबवीत असून, देशातील लघु व मध्यम उद्योगांच्या या मेळाव्यात विक्रेता आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो. औरंगाबादच्या क्षमता वाढण्यास या प्रदर्शनाची मदत होईल, असे संयोजक राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले.
इंडेक्स्पो प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आर. के. अग्रवाल, दर्शन संचेती, रूपेश ठोळे, भरत गंगाखेडकर, राजेश पाटणी, चेतन ठोळे आदींनी परिश्रम घेतले.