अपहरण करुन तीन दिवस डांबल्याची तरुणीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:11 PM2019-07-18T22:11:25+5:302019-07-18T22:11:38+5:30
पंधरा दिवसांपूर्वी तीसगाव परिसरातून अपहरण करुन साजापूर परिसरात तीन दिवस डांबून ठेवण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे.
वाळूज महानगर : पंधरा दिवसांपूर्वी तीसगाव परिसरातून अपहरण करुन साजापूर परिसरात तीन दिवस डांबून ठेवण्यात आल्याची तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी तरुणासह त्याच्या आईविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीसगाव परिसरातील तरुणीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. ५ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ती किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या तिच्या परिचयाचा अक्षय गवई व त्याची आई सुनिता हे तिच्याजवळ थांबले. सुनिताने यांनी चाकूच्या धाकाने दुचाकीवर बसविले. त्यांनी तिला दुचाकीवर बसवून साजापूररोडने तिला अज्ञात स्थळी घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, दोघांनी ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वाळूज गावात आणले. या ठिकाणी कारमध्ये थांबलेल्या प्रविण नितनवरे यांनी तिला तीसगाव परिसरातील ध्यान साधना केंद्राजवळ सोडून दिले. या ठिकाणी तरुणीने तीसगावचे माजी सरपंच अंजन साळवे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर अंजन साळवे यांनी तरुणीच्या आई-वडिलांशी संपर्क साधून तिला त्यांच्या स्वाधीन केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तरुण व त्याच्या आईविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.