तीन दिवसांआड पाणी; औरंगाबादेत काँग्रेसचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:24 AM2018-02-22T00:24:20+5:302018-02-22T00:24:27+5:30

किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

Three days water; Congress attacks Aurangabad | तीन दिवसांआड पाणी; औरंगाबादेत काँग्रेसचा हल्लाबोल

तीन दिवसांआड पाणी; औरंगाबादेत काँग्रेसचा हल्लाबोल

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीपुरवठ्यात दुरुस्ती : मनपा प्रशासनाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, शरीफ कॉलनी, बारी कॉलनी, या पाच वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी द्या, या मुख्य मागणीसाठी बुधवारी सकाळी काँग्रेसने मनपासमोर जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. या आंदोलनाची युद्धपातळीवर दखल घेऊन मनपा प्रशासनाने अवघ्या दोन तासांमध्येच पाणीपुरवठा सुरळीत करणे, दूषित पाण्याचा प्रश्न दूर करणे, लिकेज बंद करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
आझाद चौकापासून रोशनगेटपर्यंत ५० हजारांहून अधिक नागरिक राहतात. मागील अनेक महिन्यांपासून या भागातील नागरिकांना सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. त्यात महापालिकेची जलवाहिनी फुटल्यास नागरिकांना दोन आठवडे पाणी मिळत नाही. नागरिकांच्या या दु:खाकडे संबंधित लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहीम भय्या पटेल यांनी बुधवारी सकाळी मनपासमोर लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला मनपा प्रशासनाने विनंती केली की, आंदोलन करू नका पाणी प्रश्न मार्गी लावण्यात येईल. नियोजित कार्यक्रमानुसार आंदोलन सुरू करण्यात आले. पाच वॉर्डांतील असंंख्य नागरिक, महिला उपस्थित होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, तकी हसन खान, गटनेते भाऊसाहेब जगताप, पवन डोंगरे, मीर हिदायत अली, युसूफ शेख, रमजानी खान, तय्यब पटेल, सिराजभाई, नईम शेख, अली बाबा, इरफानभाई, मालोदे, अजहर खान, खालेद पठाण, लुखमान हाजी, मुख्तार पटेल, रफिक पटेल, शेख मेहराज, शफी मौलाना आदींची उपस्थिती होती.
नागरिकांना दिलासा देणार
आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न, लिकेज आणि तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उपअभियंता पद्मे यांनी आंदोलकांना दिले. या भागातील नागरिकांना तूर्त दिलासा देण्याचे प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे यावेळी अधिकाºयांनी सांगितले.
महापौर करणार पाहणी
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. महापौरांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. प्रशासनालाही पाणी प्रश्नावर सूचना दिल्या. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी आझाद चौक ते रोशनगेटपर्यंत पाहणी करण्याचे आश्वासन त्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Three days water; Congress attacks Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.