१० ते २१ वयातील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:41+5:302021-04-23T04:04:41+5:30
औरंगाबाद : शहरात मागील चार दिवसांत १० ते २१ वयोगटातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १८ एप्रिलला आंबेडकरनगर येथील ...
औरंगाबाद : शहरात मागील चार दिवसांत १० ते २१ वयोगटातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १८ एप्रिलला आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलीचा घाटीत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. १९ तारखेला आरतीनगर येथील २१ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला. बुधवारी (दि. २१) आनंदनगर येथील १७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. या तिघांना घाटीत उपचारांसाठी दाखल केल्याचे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे. लहान मुले, तरुण, युवक आजारी पडल्यास त्यांची चाचणी करून त्यांना कोरोनाची लागण झाल्यास लगेच उपचारासाठी दाखल करावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. शहरात ० ते १८ वर्षे वयोगटातील ८ हजार ८७ मुले बाधित झाली आहेत. यात ० ते ५ वयोगटातील ११७४ बालके, तर ५ ते १८ वयोगटातील ६९१३ मुला-मुलींचा समावेश आहे.
होम आयसोलेशनचे ५९ रुग्ण रुग्णालयात
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशन करून त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. मात्र, होम आयसोलेशनमधील काही रुग्ण अचानक गंभीर होत असल्याने त्यांना ऐनवेळी रुग्णालयात हलवावे लागत आहे. महापालिकेकडे आलेल्या माहितीवरून ५९ रुग्णांना रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली.