औरंगाबाद येथील महावितरणचे तीन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:43 AM2018-05-12T00:43:11+5:302018-05-12T00:44:34+5:30

गारखेडा परिसरालगत भारतनगर येथील रहिवासी जगन्नाथ शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काल कनिष्ठ लेखा सहायक सुशील कोळी यांना, तर आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सहायक लेखापाल हेमांगिनी मौर्य या दोघांना निलंबित केले.

Three employees of Mahavitaran in Aurangabad are suspended | औरंगाबाद येथील महावितरणचे तीन कर्मचारी निलंबित

औरंगाबाद येथील महावितरणचे तीन कर्मचारी निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गारखेडा परिसरालगत भारतनगर येथील रहिवासी जगन्नाथ शेळके यांच्या आत्महत्येप्रकरणी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी काल कनिष्ठ लेखा सहायक सुशील कोळी यांना, तर आज अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सहायक लेखापाल हेमांगिनी मौर्य या दोघांना निलंबित केले.
जगन्नाथ शेळके आत्महत्या प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेत प्रथमदर्शनी दोषी ठरवत आपल्या तीन कर्मचाºयांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली. मार्चमध्ये मयत शेळके यांच्यावर वीजचोरीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यांना २ हजार ६२० रुपयांचा दंड आकारला होता. शेळके यांच्या विद्युत मीटरमध्ये वीजचोरी आढळल्यामुळे त्यांचे मीटरही बदलण्यात आले. शेळके यांनी बिलात दुरुस्ती करण्याबाबत महावितरणकडे अर्जही केलेला नव्हता, असे महावितरण अधिकाºयांचे म्हणणे आहे. शेळके यांना वाढीव बिल न देता ते बाजूला ठेवणे अनिवार्य होते; परंतु नजरचुकीने त्यांना ८ लाख ६४ हजार ७८१ रुपयांचे वीज बिल दिले. महावितरणचे कनिष्ठ लेखा सहायक सुशील काशीनाथ कोळी यांना काल व आज गारखेडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत व सहायक लेखापाल हेमांगिनी मौर्य यांना निलंबित करण्यात आले.

Web Title: Three employees of Mahavitaran in Aurangabad are suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.