तीन महिला अधिकारी उतरल्या रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:02 AM2021-03-17T04:02:07+5:302021-03-17T04:02:07+5:30
फुलंब्री : तालुक्यात कार्यरत तीन महिला अधिकारी यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून मास्क न घालणाऱ्या वाहनचालक व दुकानदार यांच्यावर दंडात्मक ...
फुलंब्री : तालुक्यात कार्यरत तीन महिला अधिकारी यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून मास्क न घालणाऱ्या वाहनचालक व दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. फुलंब्रीच्या उपजिल्हाधिकारी पूजा पाटील, तहसीलदार शीतल राजपूत, मुख्याधिकारी नंदा गायकवाड यांनी ही कारवाई केली असून, पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांचीही टीम यात सहभागी होती.
सोमवारी सायंकाळी फुलंब्री शहरातील रस्त्यावर फिरून मास्क न घालणाऱ्या वाहनचालक व दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यात आली. काही तासांतच जवळपास १५ लोकांवर दोनशे रुपयांप्रमाणे तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तिन्ही महिला अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही कारवाई केल्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे. अशी कारवाई आता दररोज केली जाईल, असे पो.नि. अशोक मुद्दीराज म्हणाले. शहरातील हॉटेल, ज्यूस सेंटरमध्ये नागरिक गर्दी करीत, येथे नियमावलीचे पालन होत नाही.