घाटीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन तास कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:02 AM2021-06-09T04:02:11+5:302021-06-09T04:02:11+5:30
घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गतवर्षी दिवाळीपासून तब्बल १४८ दिवस साखळी उपोषण करून सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. आश्वासनानंतर उपोषण ...
घाटीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गतवर्षी दिवाळीपासून तब्बल १४८ दिवस साखळी उपोषण करून सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याने शुक्रवारपासून काही महिला कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. यातील एका महिलेची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी घाटीत भरती करण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपासून १५० कंत्राटी कर्मचारी संपावर गेले. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याचे सांगितले. त्यामुळे सकाळी ११ वाजता आंदोलन मागे घेत कर्मचारी कामावर गेले, असे आयटक महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे अभय टाकसाळ यांनी सांगितले.
फोटो ओळ...
कामबंद आंदोलनाप्रसंगी घाटीतील कंत्राटी कर्मचारी.