नांदुरघाटमध्ये रात्रीतून तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:48 AM2017-09-19T00:48:39+5:302017-09-19T00:48:39+5:30

नांदुरघाटमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरफोड्या केल्या.

Three housebreakings in Nandurbhat | नांदुरघाटमध्ये रात्रीतून तीन घरफोड्या

नांदुरघाटमध्ये रात्रीतून तीन घरफोड्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरघाट : केज तालुक्यातील नांदुरघाटमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरफोड्या केल्या. यामध्ये २ लाख ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
सखाराम ज्ञानोबा जाधव यांच्यां घरातील रोख रक्कम व नव्या मोबाईलसह ३० हजार रुपये, अंबर शामराव जाधव यांची १५ हजार रुपये दुचाकी व महादेव राजेंद्र दोडके यांच्या घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, असा मिळून १,९१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरटे घेऊन पसार झाले. दोडके यांचे सर्व कपडे, डाळी, पीठ, कुरवड्या, पापड्या, महिलांची कपडे चोरट्यांनी फेकून दिले.
नंतर चोरटे सखाराम जाधव यांचे गेट तोडून आत प्रवेश केल्यावर कपाट उघडत असताना त्याच्या आवाजाने घरातील लोकांना जाग आली. त्यातील एका चोराला पकडले देखील; परंतु इतर चार ते पाच जणांनी हत्यार घेऊन घरात प्रवेश केल्यावर त्याला सोडून दिले. प्रसंगावधान ओळखून जाधव यांनी पाठलाग केला नाही; अन्यथा प्रकार वेगळाच घडला असता. जो पकडला होता, त्याला ओळखले होते. सकाळी ५-६ जण पारधी पिढीवर विचारपूस करायला गेल्यावर तेथे दगडफेक आरोपींनी केली. यामुळे तर संशय आणखी बळावला. मग गावकरी एकत्र होऊन ३००-४०० लोक पारधी पिढीवर गेले. लोकांना पाहून आरोपी पळू लागले; परंतु नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सकाळी दहा वाजता ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. सकाळी ११ वाजता श्वान पथक बोलावण्यात आले. तेथे चोरट्याच्या पडलेल्या शर्टचा श्वानाला वास दिल्याबरोबर श्वान बराच वेळ फिरले. चोरी झालेल्या घराला दोन वेढे टाकून गावाबाहेरील पारधी पेढीवर जाऊन थांबले. आधी जे पाच जण पकडले, त्यातील दोघांच्या घरासमोर श्वान जाऊन उभे राहिले. यावरून पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी यांचा संशय बळावला. याच दरम्यान चोरी गेलेल्या मोबाईलचे कव्हर तेथे सापडले. आरोपी मध्ये धनंजय काळे (रा. पळसे, ता. वाशी), शंकर काळे, रामा शिंदे, शिवा दादा शिंदे (रा. नांदुरघाट) व संतोष काळे (रा कळंब) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Three housebreakings in Nandurbhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.