देवऴाणाफाट्यावर एकाच रात्रीत तीन घरे फोडली, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:53 PM2018-02-03T19:53:29+5:302018-02-03T19:54:45+5:30
खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणाफाट्यावरील तीन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यातील एका घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास झाला करण्यात आला आहे. चोरी झालेल्या तीन घरापैकी दोन घराचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.
औरंगाबाद : खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील गदाणा नजीक देवळाणाफाट्यावरील तीन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यातील एका घरातून ६५ हजाराचा ऐवज लंपास झाला करण्यात आला आहे. चोरी झालेल्या तीन घरापैकी दोन घराचे मालक बाहेरगावी असल्याने चोरीचा निश्चित आकडा समजू शकला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळानाफाट्यावरील प्रथम श्रावण दशरथ जाधव यांचे घर फोडले. यात त्यांनी घरातील जवळपास 65 हजार रूपयाचे ऐवज चोरी केला. त्यानंतर चोरट्यांनी शेजारीलच आणखी दोन घरांचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पंरतू या दोन्ही घराचे मालक मुंबईला गेले असून ते आल्यावरच तेथील चोरीचा निश्चित आकडा कळेल.
दरम्यान घटनास्थळी श्वानपथक यांनी चोरांचा माग काढला पण अधिक माहिती मिळाली नाही. मात्र ठसे तज्ञांनी घरातून काही ठसे मिळाली आहेत. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हरीष खेडकर, पोहकॉ नीळकंठ देवरे, आर.बी. भुसारे यांनी भेट देऊन पंचनामा केला. त्याच बरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक पवार, नवले, गागंवे, राहूल पगारे यांनी भेट देऊन पाहणी केली. एकाच रात्री तीन घरे चोरट्यांनी फोडल्याने गदाणा, देवऴाणा, सुलतानपूर परिसरात शेतवस्तीवर राहणा-या शेतक-यात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी या भागात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.