तीन अपघातात तीन ठार

By Admin | Published: September 20, 2015 12:53 AM2015-09-20T00:53:47+5:302015-09-20T00:53:47+5:30

Three killed in three accidents | तीन अपघातात तीन ठार

तीन अपघातात तीन ठार

googlenewsNext
>पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या तीन अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चतु:श्रुंगी, सिंहगड रस्ता, खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृतांमध्ये ६६वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश आहे.
मदन गोपाळ गुप्ता (वय ६६, रा. यश रेसिडेन्सी, पाषाण सुस रस्ता) यांचा पाषाण रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी मोटारसायकलस्वार आकाश राम ससार (रा. सुस गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्ता साई चौकाजवळून रस्ता ओलांडत असताना त्यांना आकाश चालवीत असलेल्या मोटारसायकलची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गुप्तांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडला होता.
खडकी येथील रेंजहिल्स जवळील केंद्रिय विद्यालयासमोर पीएमपीची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला होता. या अपघातात राजेश्वरा सी. एच. (वय ३२, रा. रेंजहिल्स, खडकी) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी स्वामीराव महादेव राजेगावकर (वय ३१, रा. वारजे) यांना अटक केली आहे. राजेगावकर चालवीत असलेल्या बसची राजेश्वरा यांना पाठीमागून धडक बसली होती.
तर मुंबई बेंगलोर महामार्गावर सनसिटीजवळ मंगळवारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात संतोष जगन्नाथ चोबे (वय ४१, रा. तारकेश्वर विहार सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांचा मृत्यू झाला. चोबे सनसिटी समोरील रस्त्याने चालत जात असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. सिंहगड रोड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three killed in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.