टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात तीन मजूर जागीच ठार; कन्नड बायपासवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:59 PM2021-07-17T17:59:15+5:302021-07-17T17:59:47+5:30
Accident On Kannada Bypass : मृत तिन्ही मजूर मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती.
कन्नड ( औरंगाबाद ) : भरधाव टेम्पो व दुचाकीच्या धडकेत तीन मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास कन्नड बायपासवर घडली. मृत तिन्ही मजूर मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ( Three laborers killed on the spot in a horrific accident of a tempo-bike near Kannad )
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मूळ मध्यप्रदेश येथील मुकेश केकडिया निगवाल (२७), भुवानसिंग छमकार निगवाल (२७), सुनील पुण्या असकल्य (२८) हे मजुरीचे काम करतात. आज दुपारी कन्नडकडून -चाळीसगावकडे तिघेही एकाच दुचाकीवरून (क्र. एमएच २० बीएस ३९९३) जात होते. दरम्यान, कन्नडकडून सोलापुर-धुळे महामार्ग ओलांडीत असतांना चाळीसगावकडून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने (क्र एमएच २० इएल ३६४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.