उजळून देण्याच्या नावाखाली तीन तोळ्याचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:44 AM2017-10-13T00:44:24+5:302017-10-13T00:44:24+5:30
सोन्याचे दागिने उजळून देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी सासू-सुनाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स, असा सुमारे तीन तोळ्याचा ऐवज लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोन्याचे दागिने उजळून देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी सासू-सुनाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स, असा सुमारे तीन तोळ्याचा ऐवज लंपास केला. ही घटना पहाडसिंगपुरा येथे ११ आॅक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, पहाडसिंगपुरा येथील रहिवासी कमलाबाई सुंदरलाल कणसे (५५) आणि त्यांची सून रेखा कणसे या गुरुवारी दुपारी घरी होत्या. त्यांनी त्यांच्या अंगणात पितळी आणि तांब्याची भांडी ठेवली होती. यावेळी २८ ते ३० वयाचे दोन अनोळखी तरुण तेथे आले आणि अत्यल्प दरात भांडी आणि दागिने उजळून देतो, असे ते म्हणाले. सुरुवातीला त्यांनी घरासमोरील तांबे-पितळी धातूची भांडी उजळून दाखविली. यावेळी लहान मुलींच्या हातातील चांदीचे कडे आणि पायातील चांदीची चैन त्यांनी उजळून दाखवून सासू-सुनांचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्सही मळाल्याने काळे पडल्याचे म्हणाले. हे दागिने पंधरा मिनिटांत नवे कोरे करून देतो, असे ते म्हणाले. आरोपी अत्यंत गोड बोलत असल्याने त्यांनी गळ्यातील सोन्याचे दोन डोरले असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स आरोपींकडे काढून दिले. यावेळी त्यांनी स्वयंपाक घरातील एका पातेल्यात पाणी आणि पावडर टाकली आणि त्यात हे दागिने टाकले. हे पाणी गरम होत असतानाच आरोपींनी त्यात काहीतरी लिक्विड टाकल्याने धूर निर्माण झाला. यावेळी पंधरा मिनिटांनंतर पातेल्याचे झाकण उघडा असे ते म्हणाले.