आणखी तीन ठिकाणी ‘मास्टर प्लॅन’

By Admin | Published: November 14, 2014 12:25 AM2014-11-14T00:25:59+5:302014-11-14T00:54:49+5:30

सोमनाथ खताळ , बीड बीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे

Three more 'master plan' | आणखी तीन ठिकाणी ‘मास्टर प्लॅन’

आणखी तीन ठिकाणी ‘मास्टर प्लॅन’

googlenewsNext


सोमनाथ खताळ , बीड
बीड शहरात विविध विकास कामे आजही प्रलंबीत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या बीडकरांची डोकेदुखी ठरत असताना आणखी एक बीड शहराच्या वैभवात भर पडणारे काम पालीकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वीच कारंजा, बलभीम चौक, माळीवेस रस्त्यांवर मास्टर प्लॅन चे काम झाले होते, त्याच धरतीवर शहरातील आणखी तीन मुख्य रस्त्यांचे रूंदीकरण होणार असून याचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे.
बीड शहर विकास आराखड्यांतर्गत शहरातील मुख्य भागातील रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात येणार आहे. मागील १४ वर्षापासून प्रलंबीत असलेले हे प्रस्ताव आता लवकरच निकाली लागणार असल्याने बीड शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार असून वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. घरांनी, ओट्यांनी, वाहनांनी आगोदरच रस्ता अरूंद केला आहे. या अरूंद रस्त्यांमुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आलेले आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहन जर रस्त्यावरून जात असेल तर दुसऱ्या वाहनाला त्या रस्त्यावरून एन्ट्री सुद्धा नसते, एवढे अरूंद रस्ते शहरातील झाले आहेत.
रस्त्याने घेतला मोकळा श्वास
तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या कार्यकालात शहरातील मुख्य आणि वर्दळीचा असणाऱ्या कारंजा ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस दरम्यानच्या रस्त्याचे मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. हा रस्ता रूंद झाल्याने अनेक दिवसापासून नागरीकांना करावा लागत असलेला त्रास थांबला. आता या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून कसलीच वाहतूक कोंडी होत नाही.कारंजा ते माळीवेस दरम्यान मास्टर प्लॅन चे काम करण्यात आले होते. या मास्टर प्लॅनमध्ये मस्जीद, मंदीर, आले. मात्र जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर, नगराध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, पालीकेचे गटनेते डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्त्यावर उतरून दोन्ही समाजातील नागरीकांशी संवाद साधला. त्यानंतर नागरीकांना सोबत घेऊन मास्टर प्लॅन चा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजातील नागरीकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून मास्टर प्लॅन च्या काम पार पाडून हम साथ साथ है अशी भूमीका बजावली.
नागरीकांनी घेतला होता पुढाकार
या रस्त्या दरम्यान अनेकांची घरे, दुकाने येत होती. मात्र शहराच्या विकासासाठी अनेकांनी स्वत: आपली घरे पाडली, दुकाने मागे घेतली आणि प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळेच हा मास्टर प्लॅन सक्सेस झाला.
आदेश मिळाले की काम सुरू- शेख
सध्या तीन ठिकाणच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. राहिलेल्या तीन रस्त्यांच्या मास्टर प्लॅन चे आदेश मिळाले की लगेच काम सुरू करण्यात येईल असे सहायक नगर रचनाकार सलीम शेख यांनी सांगितले.

Web Title: Three more 'master plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.