आणखी तीन टॉवरला सील
By Admin | Published: March 20, 2016 01:10 AM2016-03-20T01:10:31+5:302016-03-20T02:12:43+5:30
परभणी : महापालिकेने शनिवारी आणखी तीन अनधिकृत मोबाईल टॉवरला सील ठोकले आहे. त्यामुळे आतापर्यंत कारवाई केलेल्या टॉवरची संख्या ४३ झाली आहे.
परभणी : महापालिकेने शनिवारी आणखी तीन अनधिकृत मोबाईल टॉवरला सील ठोकले आहे. त्यामुळे आतापर्यंत कारवाई केलेल्या टॉवरची संख्या ४३ झाली आहे.
आयुक्त राहुल रेखावार यांनी अनधिकृत टॉवरवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कर अधीक्षक श्रीपाद कुलकर्णी, अल्केश देशमुख, प्रभाग समिती अ चे डी.एन. तिडके, ब चे अ.माजीद काजी आणि प्रभाग समिती क चे पंडित अडकिणे यांच्यासह पथक कारवाईसाठी शहरात फिरत आहे. १९ मार्च रोजी सुभेदारनगर, शास्त्रीनगर आणि खंडोबा मंदिर परिसरात तीन टॉवरला सील ठोकण्यात आले. प्रभाग समिती ब अंतर्गत आयडिया सेल्यूलर कंपनीने ७ लाख रुपयांचा भरणा केल्याने ५ टॉवरचे सील काढले. प्रभाग समिती अ अंतर्गत आयडिया, रिलायन्स, वजिराबाद, शिवाजी चौक, सहकारनगर, त्रिमूर्तीनगर आणि प्रभाग समिती ब अंतर्गत आयडिया कंपनीच्या ५ टॉवरचे सील काढण्यात आले. या कंपनीने ६ लाख रुपयांचा दंड अदा केला आहे. तसेच जीटीएस कंपनीने ३ लाख ६० हजारांचा भरणा केल्याने कंपनीच्या तीन टॉवरचे सील काढल्याची माहिती मनपाने दिली.