तीन ‘मुन्नाभार्इं’ना अटक

By Admin | Published: April 12, 2016 12:16 AM2016-04-12T00:16:54+5:302016-04-12T00:41:09+5:30

औरंगाबाद : संजय दत्तच्या गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये दाखविण्यात आलेल्या कॉपीच्या प्रसंगाचीच ‘कॉपी’ करून जवान बनू पाहणाऱ्या तिघांना

Three 'Munnabhai' arrested | तीन ‘मुन्नाभार्इं’ना अटक

तीन ‘मुन्नाभार्इं’ना अटक

googlenewsNext


औरंगाबाद : संजय दत्तच्या गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये दाखविण्यात आलेल्या कॉपीच्या प्रसंगाचीच ‘कॉपी’ करून जवान बनू पाहणाऱ्या तिघांना सोमवारी सकाळी सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये भरती परीक्षेच्या वेळी रंगेहाथ पकडण्यात आले. यातील दोघे आपल्या बनियनच्या शिलाईमधून मायक्रोफोनची वायरिंग करून मोबाईलच्या आधारे कॉपी करण्याच्या प्रयत्नात होते, तर तिसरा आपला ‘ढ’ भाऊ उत्तीर्ण व्हावा म्हणून त्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी बसला होता.
आरोपींमध्ये मदन कपूरचंद गुसिंगे (२२, रा. कौचलवाडी, अंबड, जालना), विजयसिंग रतनसिंग जारवाल (२४, रा. हुसैनपूर, पैठण) व जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. कौचलवाडी, अंबड) यांचा समावेश आहे. तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, सध्या सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये ४४ जवान पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच शारीरिक चाचणी पार पाडली. त्यात उत्तीर्ण झालेल्या ८६९ उमेदवारांची लेखी परीक्षा सोमवारी ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजेच्या सुमारास परीक्षा सुरू होणार होती. तत्पूर्वी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी हॉलमध्ये बसवलेल्या उमेदवारांची कसून अंगझडती सुरू करण्यात आली. अंगझडतीच्या वेळी आरोपी मदन गुसिंगे याचा नंबर आला तेव्हा तो गांगरला. त्यामुळे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा संशय आला. त्याची बारकाईने तपासणी केली. तेव्हा बनियनमध्ये वायरसारखे काही तरी त्यांच्या हाताला लागले. मग त्याला बनियन काढण्यास सांगण्यात आले. बनियन काढताच त्याचे बिंग फुटले. त्याच्या बनियनमध्ये मोबाईल, मायक्रोफोन आढळून आला. कॉपी करण्यासाठी बनियनमध्ये हे साहित्य त्याने दडवून ठेवले होते. लगेच त्याला पकडून बाजूला करण्यात आले.
असेच आणखीही काही ‘मुन्नाभाई’ असू शकतात, असा संशय आल्याने सर्वच उमेदवारांची आणखी अत्यंत बारकाईने झडती घेण्यात आली. त्यात विजयसिंग जारवाल या उमेदवारानेही कॉपीसाठी मदनच्या कॉपी करण्याच्या पद्धतीचीच ‘कॉपी’ केलेली आढळून आली. विजयसिंगनेही स्वत:च्या बनियनच्या शिलाईत वायरिंग करून मोबाईल दडविलेला आढळून आला.
डमी परीक्षार्थीही सापडला
जारवाल आणि गुसिंगे हे दोन हायटेक कॉपीबहाद्दर पकडल्यानंतर सर्व परीक्षार्थींच्या कागदपत्रांचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. तेव्हा पवन गोविंद जरावंडे या परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. त्याला मग ‘खाक्या’ दाखविताच त्यानेही तोंड उघडले. परीक्षा देणाऱ्या या तरुणाचे नाव जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. कौचलवाडी) असे असल्याचे समोर आले. त्याचा ‘ढ’ भाऊ पवन जरावंडेच्या नावावर तो परीक्षा देत होता.
पवन हा शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाला होता; परंतु लेखी परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ, याची त्याला खात्री नव्हती. म्हणून भावाला उत्तीर्ण करण्यासाठी जीवन ‘तयारीनिशी’ त्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आला होता.
चौघांविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा
हायटेक कॉपीच्या प्रयत्नात असलेल्या मदन गुसिंगे, विजयसिंग जारवाल या दोघांसह पवन जरावंडे आणि त्याच्या नावावर परीक्षा देणारा त्याचा भाऊ जीवन या चौघांविरुद्ध निरीक्षक फकीरचंद घुगे यांच्या फिर्यादीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील पवन जरावंडे वगळता तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपी जारवाल आणि गुसिंगे या दोघांनी कॉपी करण्यासाठी एकमेकांच्या पद्धतीचीही ‘कॉपी’ केलेली होती. गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त परीक्षेत जसा मोबाईलचा वापर करीत कॉपी करतो, तीच पद्धत या दोघांनी अवलंबिली होती. दोघांनी काळ्या रंगाची सारखीच बनियन घातलेली होती.
४बनियनच्या शिलाईमध्ये मायक्रोफोनची वायरिंग केलेली होती. बनियनमध्येच दोघांनी मोबाईल दडविलेला होता. हाती प्रश्नपत्रिका पडताच ती मोबाईलच्या कॅमेऱ्याने स्कॅन करून बाहेर असलेल्या साथीदाराला पाठवायची. मग बाहेरचा साथीदार गाईडमधून उत्तरे शोधून मोबाईलद्वारे या आरोपींना उत्तरे सांगणार.
४ ही उत्तरे परीक्षार्थी आरोपी बनियनमध्ये दडविलेल्या मायक्रोहेड फोनद्वारे ऐकून उत्तरपत्रिकेत लिहिणार, अशी ही पद्धत होती. हे भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही मुन्नाभार्इंचा डाव उधळला. अन्यथा या परीक्षेचा पेपरच फुटला असता.

Web Title: Three 'Munnabhai' arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.