तीन ग्रामपंचयातीच्या तीन बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:05 AM2021-01-20T04:05:27+5:302021-01-20T04:05:27+5:30

शेकटा : शेकटा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याच पॅनेलला न मिळाल्याने ग्रामपंचायत त्रिशंकू झाली आहे. दोन पॅनेलचे प्रत्येकी चार, ...

Three news of three gram panchayats | तीन ग्रामपंचयातीच्या तीन बातम्या

तीन ग्रामपंचयातीच्या तीन बातम्या

googlenewsNext

शेकटा : शेकटा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणत्याच पॅनेलला न मिळाल्याने ग्रामपंचायत त्रिशंकू झाली आहे. दोन पॅनेलचे प्रत्येकी चार, तर एका पॅनेलचा एक उमेदवार निवडून आल्याने येथे रंगत वाढली आहे. माजी सरपंच नामदेवराव वाघ व संपतराव वाघ यांच्या ग्रामविकास पॅनेलचे इंदुबाई वाघ, किरण जाधव, सतीष शिंदे, बाळकृष्ण जाधव हे चार उमेदवार निवडून आले; तर विद्यमान उपसरपंच बाबासाहेब वाघ यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचे नीता वाघ, अक्षया वाघ, सकुबाई वाघ, लताबाई अंबिलढगे हे चार उमेदवार निवडून आले. सुभाष वाघ यांच्या युवा शक्ती ग्रामविकास पॅनेलच्या सुनीता वाघ या एकमेव उमेदवार निवडून आल्या. त्यामुळे गावात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील ग्रामपंचायतीची चावी सुनीता वाघ यांच्याकडे असल्याने त्या कोणत्या पॅनेलला जोडल्या जातात, यावर येथील ग्रामपंचायतीचे भवितव्य अवलंबून आहे.

-----------

वाहेगाव ग्रामपंचायतीवर जनशक्ती विकास पॅनेलचे वर्चस्व

वाहेगाव (देमणी) : ग्रामपंचायतीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांच्या जनशक्ती विकास पॅनेलचे सिंधू शिंदे, धुप्रताबाई तोगे, वैशाली शिंदे, सुभाष सोनवणे हे चार उमेदवार निवडून आले आहेत, तर उपसरपंच भगवान शिंदे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनेलच्या ज्योती शिंदे, रुखमन शिंदे, गोरख कानुले हे तीन उमेदवार निवडून आले आहेत. जनशक्ती विकास पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले असल्याने ग्रामपंचायतीवर त्यांचे वर्चस्व असणार आहे.

--------

करजगाव ग्रा. पं. वर युवाशक्तीचा विजय

करजगाव : करजगाव हसनाबादवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर युवा शक्ती ग्रामविकास पॅनेलचा झेंडा फडकला आहे. करजगाव-हसनाबादवाडी येथील ग्रुप ग्रामपंचायतीवर युवा शक्ती ग्रामविकास पॅनेलच्या सावता गाडेकर, अरुणा गाडेकर, समता गोलवाल, बाळू चोपडे, लक्ष्मण घावटे, सुनीता भेरे, रुखमन राऊत या बिनविरोध आलेल्या आहेत, तर आदर्श ग्रामविकास पॅनेलचे संतोष बोरुडे, मनीषा शिंदे हे दोन उमेदवार निवडून आलेले आहेत. युवा शक्ती ग्रामविकास पॅनेलचे सात उमेदवार निवडून आले असून, ही ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात गेली आहे.

Web Title: Three news of three gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.