अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

By Admin | Published: June 22, 2014 11:14 PM2014-06-22T23:14:15+5:302014-06-23T00:25:59+5:30

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात अपहारप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Three offenders with the institutional officer in the case of the offense | अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

googlenewsNext

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात एक लाख, १४ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, संस्थाचालकाविरूध्द अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे़
पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर येथील अमर परमेश्वर-कदम यांनी तुळजापूर न्यायालयात अपहार प्रकरणी तक्रार दिली होती़ नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरीअल उर्दू शाळेचे अध्यक्ष सय्यद तनवीरअली खतीब, सचिव जावेद वलीउल्ला काझी, मुख्यध्यापिका महेबुबी अ-रजाक शेख यांनी संगणमत करून शालेय पोषण आहारात १६ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर २०१३ व २१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत इंधन, भाजीपाला खर्चापोटी जवळपास एक लाख, १४ हजार रूपयांचा बनावट खर्च दाखवून अपहार करीत शासनाची फसवणूक केली़ तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक एस़आरग़ुरव, विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे, केंद्रप्रमुख एम़एस़भोरे यांची नियुक्ती केली होती़ या पथकाने १३ सप्टेंबर रोजी शाळेस भेट देवून पंचनामा करून अहवाल दाखल केला होता़ पंचनाम्यादरम्यान पाच वर्गखोल्यात १ लाख, ६ हजार ३९४ रूपयांचा ७८ क्विंटल ५० किलो तांदळाचा अनाधिकृत साठा आढळून आला होता़ मिळालेल्या साठ्यातल १५ क्विंटल तांदळाची नासाडी झाली होती़ तर ३७ पॉकेट गोडेतेल कालबाह्य झाले होते़ असे असतानाही मुख्याध्यापिकेने तांदूळ संपल्याचा अहवाल वरिष्ठांना देत तांदळाची मागणी केली होती़ तांदूळ शिल्लक असतानाही ते शिजविण्यासाठीची मजुरी, भाजीपाला व इंधनाच्या खर्चाची मागणीही प्रशासनाकडे करून खर्ची टाकली होती़ याप्रकरणी सर्वस्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रशासनाने मात्र सोईस्करपणे भिजतघोंगडे ठेवले होते़ याबाबत कदम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने ९ महिन्यानंतर संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून वरील तिघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाकडून अद्याप कारवाई न करता भिजत घोंगडे कायम ठेवले आहे़ संस्थेने मुख्याध्यापिकेस यापूर्वीच निलंबित केले आहे़ तांदळाचा साठा शिल्लक असताना पुन्हा पुरवठा का केला, चौकशीत तांदूळ शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले असतानाही मजुरी, भाजीपाला व इंधनापोटी खर्ची केलेली रक्कम वसूल का केली नाही, अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्यानंतरही तांदूळ शिल्लक कसा राहिला यासह इतर अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

Web Title: Three offenders with the institutional officer in the case of the offense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.