तीन पोलीस निरीक्षक कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:05 AM2021-03-23T04:05:17+5:302021-03-23T04:05:17+5:30
शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आयुक्तालय हद्दीतील ...
शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाणेदार, गुन्हे शाखा, मोटार परिवहन विभाग आणि राखीव पोलीस निरीक्षक यांची सोमवारी गुन्हे आढावा बैठक पोलीस आयुक्तालयात बोलावली होती. बैठकीला येताना आयुक्तालयाच्या गेटवर अँटिजेन टेस्ट करून यावे, असे आदेश देण्यात आले होते. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तालयाच्या गेटवर अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली. यावेळी एकापाठोपाठ तीन पोलीस निरीक्षकांचे अहवाल अँटिजेन टेस्टमध्ये कोरोना सकारात्मक आले. याविषयीची माहिती मिळाल्यावर पोलीस आयुक्तांनी गुन्हे आढावा बैठक रद्द केल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
=======
कोट
जिल्हा बॅंक मतमोजणी बंदोबस्तासाठी डिसीपी, एसीपी आणि काही अधिकारी व्यग्र होते, तर काही अधिकारी कोर्टात साक्षीसाठी गेले होते. बजेटसंदर्भातील काही कामे तातडीने करायची असल्याने आजची बैठक पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, तीन ते चार अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजले.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त.