ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:46 AM2024-02-09T05:46:39+5:302024-02-09T05:47:50+5:30

बहिणीसह दोन भावांचा जागीच मृत्यू, कुटुंबच कोलमडून पडले; आईवडिलांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला

Three Sakkhi siblings were crushed in the overtaking competition of Hiwa drivers in sambhajinagar accident | ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

ह्रदयद्रावक... हायवा चालकांच्या ओव्हरटेक स्पर्धेत तीन सख्खी भावंडे चिरडली

लोकमत न्यूज नेटवर्क   
छत्रपती संभाजीनगर : वाळू वाहणाऱ्या दोन सुसाट व बेफाम हायवा चालकांच्या ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत तीन सख्ख्या भावंडांचा करुण अंत झाला. तिघेही दुचाकीवरून ट्रीपल सीट घरी परतत असताना ते या हायवांच्या चाकाखाली सापडले. थेट अंगावरूनच अवजड हायवा गेल्याने बहीण व दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा भगवान अंभोरे (२२), प्रदीप ऊर्फ लखन भगवान अंभोरे (२५) व प्रवीण भगवान अंभोरे (२८) अशी मृत भावंडांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी बीड बायपासवरील हॉटेल पाटीलवाड्यासमोर हा अपघात घडला.   

मैदानी चाचणीत यशस्वी ठरली; पण... 
nगुरुवारी पहाटे ५ वाजताच तिघेही एकाच दुचाकीवरून शेंद्रा परिसरात गेले होते. 
nप्रतीक्षाने मैदानी चाचणीदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्या आनंदात ते तिघेही ९ वाजता घराकडे निघाले.
nमात्र, बाळापूर फाट्याजवळ दोन सुसाट हायवा एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत हाेते.
nत्या बेजबाबदार चालकांच्या स्पर्धेत तीन भावंडांच्या दुचाकीला धडक लागली व दुचाकी थेट एका हायवाच्या चाकाखाली सापडली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. हायवा चालक मात्र पसार झाले.

तिघांचे मृतदेह पाहताच वडिलांना धक्काच असह्य 
तिघांचे मृतदेह घाटीच्या शवविच्छेदनगृहात रवाना करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सर्व नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. मुलांचा किरकोळ अपघात झालाय, असे सांगून आई-वडिलांना शहरात बोलावण्यात आले. 
लवकरच शासकीय सेवेत रुजू होताना पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांवर मात्र लाडकी मुलगी व दोन मुलांचे मृतदेह पाहण्याची वेळ आली. आईचा आक्रोश थांबत नव्हता, तर वडिलांना धक्काच असह्य झाला. प्रवीण यांच्या पत्नीला नातेवाइकांना आवरणे कठीण झाले होते.  

मैदान मारले होते
nमूळ जिंतूर तालुक्यातील अकोली येथील अंभोरे कुटुंबातील मोठा मुलगा प्रवीण सातारा परिसरात पत्नी व एक वर्षाच्या मुलासह राहतो. त्यांची लहान बहीण प्रतीक्षा काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिस भरती व वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली होती. 

सरकारी नोकरीचे स्वप्न अधुरेच 
प्रतीक्षाला वन परीक्षेच्या लेखी परीक्षेत १२० पैकी ८४, तर मैदानी चाचणीत ८० पैकी ५० गुण प्राप्त झाले होते. मुंबई पोलिस भरतीत ती प्रतीक्षा यादीत होती.
निवड होण्यापूर्वीच तिचा
करुण अंत झाला.

घरातील तरुण दोन मुले आणि एक मुलगी अपघातात ठार झाल्याने त्यांच्या आईवडिलांनी हंबरडा फोडला तेव्हा काळीज हेलावले.

 

Web Title: Three Sakkhi siblings were crushed in the overtaking competition of Hiwa drivers in sambhajinagar accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.