बजाजनगरात तीन पानटपऱ्या फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:28 PM2019-02-19T23:28:06+5:302019-02-19T23:28:15+5:30
बजाजनगरात चोरट्यांनी तीन पानटपºया फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.
वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात चोºयाचे सत्र सुरुच असून, बजाजनगरात चोरट्यांनी तीन पानटपºया फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी रोख रकमेसह जवळपास ५० हजारांचा ऐवज लांबविला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला आहे.
या परिसरात गत महिनाभरापासून घरफोड्या तसेच कंपनीतील साहित्य चोरीचे प्रकार वाढले आहेत. या भागात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करीत घरफोड्या करुन सोन्या-चांदीच्या दागिण्यास लाखोचा ऐवज लांबविला आहे. बजाजनगरात चोरट्यांनी मंगळवारी रात्री तीन पानटपºया फोडल्याची घटना उघडकीस आल्यामुळे व्यवसायिक व नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे. बजाजनगराच्या महाराणा प्रताप चौकातील पानमहल फोडून चोरट्यांनी रोख १० हजार रुपयांसह ऐवज लांबविला. दुसºया घटनेत परिसरातीलच पानटपरीचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह साहित्य चोरुन नेले. तिसºया घटनेत चोरट्यांनी गुरुकृपा पान सेंटर या टपरीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते न तुटल्याने ऐवज बचावला. या चोºयांमुळे व्यावसायिकांसी नागरिकांचे भितीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद
पानमहल ही टपरी फोडताना एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाला आहे. या चोरट्याने अन्य साथीदारांच्या मदतीने या चोºया केल्याचा संशय टपरी व्यवसायिकांनी केला आहे. या फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांना तात्त्काळ अटक करावी, अशी मागणी व्यावसायिकांतून केली जात आहे.